27.7 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeChiplunचिपळूणमध्ये मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती

चिपळूणमध्ये मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती

पाईपलाईन स्थलांतरित करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला होता.

शहरातील शिवनदी पुलानजीक नदीतून गेलेल्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती अनेक वर्षे रखडली होती. तेथे गळती लागल्यास मोठी यंत्रणा लावावी लागत होती. त्यामुळे आता नदीतील जलवाहिनी हटवून पुलावरून टाकली जात आहे. सुमारे ७० मीटर लांबीच्या या जलवाहिनीचे काम मंगळवारी रात्रीपासून सुरू झाले. त्यासाठी बाजारपेठ मुख्य रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू केली असून, वडनाकामार्गे वाहतूक हलवण्यात आली आहे. पालिकेच्या जुन्या पाणी योजनेतील मुख्य जलवाहिनी शिव नदीतून नेण्यात आली होती. या नदीतील गाळ उपसा केल्यानंतर ही जलवाहिनी वर येऊन अनेकदा तिला गळती लागली होती. पावसात देखील गळती लागल्याने दुरुस्तीसाठी मोठी कसरत करावी लागत होती.

त्यामुळे या ठिकाणची पाईपलाईन स्थलांतरित करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला होता; परंतु हे काम काही कारणास्तव लांबणीवर पडले होते; तसेच मुख्य पाइपलाईन असल्याने पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होणार होता. त्यामुळे पूर्वतयारी करूनच हे काम करण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे ७० मीटर लांबीची पाईपलाईन आधीच जोडून घेतली होती, तसेच शिवनदी पुलाला लोखंडी अँगल उभारून त्यावर पाईप ठेवण्याची पूर्वतयारी केली होती. त्यानुसार बाजारपेठेतील रहदारी कमी होताच मंगळवारी रात्री ९ वाजल्यापासून या कामाला सुरुवात झाली. क्रेनच्या मदतीने पाईप रात्रीच उचलून अँगलवर ठेवण्यात आली.

त्यानंतर बुधवारी सकाळपासून दोन्ही बाजूने पाईपलाईन जोडण्याचे काम सुरू होते. या कामासाठी चिंचनाक्यातून बाजारपेठेकडे जाण्यासाठी एकेरी मार्ग सुरू ठेवण्यात आला होता. बाजारपेठेतून वडनाकामार्गे वाहतूक वळवण्यात आली होती. सायंकाळी उशिरापर्यंत हे काम सुरू होते. या कामामुळे बाजारपेठेसह मार्कंडी, कावीळतळी, बहादूरशेखनाका या भागातील काही वस्तीत पाणीपुरवठा बंद होता. त्या भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular