27.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriलांजामध्ये भरधाव ट्रेलरने महिलेला चिरडले

लांजामध्ये भरधाव ट्रेलरने महिलेला चिरडले

अपघातानंतर ट्रेलरचालक सद्दाम अन्सारी याने घटनास्थळावरून पलायन करत तो गोव्याच्या दिशेने निघाला होता.

गोव्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रेलरने दोन पादचारी महिलांना चिरडले. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात गुरुवारी (ता. २३) सकाळी सव्वाआठच्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी घाटात घडला. दरम्यान, अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रेलर चालकाला देवधे फाटा येथे पकडले तर गंभीर जखमी महिलेला पल्लवी पेंढारी उपचारासाठी पाली ग्रामीण रुग्णालय व तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. आंजणारी पेंढारीवाडी येथील रहिवासी असलेल्या या दोन्ही महिला सकाळी शेतकामासाठी चालल्या होत्या.

मुंबई-गोवा महामार्गावरून जात असताना गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रेलर (एचआर ३८ व्ही ८७९४) ने दोघींना धडक दिली. हा ट्रेलर सद्दाम हकीमुद्दिन अन्सारी (वय २६, रा. तहसील वैनपूर, जि. कैमूर, बिहार) चालवत होता. धडकेनंतर पल्लवी प्रकाश पेंढारी (वय ३५, रा. आंजणारी पेंढारीवाडी) अक्षरशः चिरडली गेली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला तर जयश्री धोंडू पेंढारी (वय ४७) ही गंभीर जखमी झाली. महामार्गावर चार ट्रेलर एकामागोमाग भरधाव येत होते. त्यातील या चालकाने दोघींना ठोकरले आणि पलायन केले. अपघातानंतर ट्रेलरचालक सद्दाम अन्सारी याने घटनास्थळावरून पलायन करत तो गोव्याच्या दिशेने निघाला होता.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आणि चालकाने पलायन केल्यानंतर त्याला देवघेफाटा या ठिकाणी ग्रामस्थांच्या साह्याने पकडले. गंभीर जखमी महिलेला पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्याचप्रमाणे हातखंबा वाहतूक पोलिस मदतकेंद्राचे पोलिसदेखील दाखल झाले होते. पकडलेल्या ट्रेलर चालकाला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. अपघातप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मृत पल्लवी पेंढारी यांच्या मागे पती आणि तीन मुलगे असा परिवार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular