26 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

गणेशोत्सवात ‘कोरे’चा प्रवाशांना दिलासा…

कोकण रेल्वे प्रशासनाने यंदा गणेशोत्सवासाठी केलेल्या विशेष...

चिपळूण पालिकेच्या इमारतीचा वापर थांबवा

पालिकेची मुख्य इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक...

मुंबईतून ‘रो-रो बोट’ साडेसात तासांत रत्नागिरीत…

मुंबई ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग रो-रो बोट सेवेची चाचणी...
HomeRatnagiriअंगणवाड्यांचे कामकाज २३ दिवस ठप्प, बेमुदत आंदोलन सुरूच

अंगणवाड्यांचे कामकाज २३ दिवस ठप्प, बेमुदत आंदोलन सुरूच

जिल्ह्यात सुमारे अडीच हजार अंगणवाड्या असून, त्यांना २३ दिवस कुलूप आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे, निवृत्तीवेतन दर महिना देणे, नवीन मोबाईल देणे, रिचार्जसाठी रक्कम मंजूर करणे, पोषण आहाराची रक्कम वाढवणे या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे बेमुदत आंदोलन ४ डिसेंबरपासून सुरूच आहे. २३ दिवस गावागावांतील अंगणवाड्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. अंगणवाडी कर्मचारी संपाची दखल अद्यापही शासन घेत नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. जिल्ह्यात सुमारे अडीच हजार अंगणवाड्या असून, त्यांना २३ दिवस कुलूप आहे. चिमुकल्यांचा किलबिलाट थांबला आहे.

एकीकडे प्रचंड महागाई अन् दुसरीकडे तुटपुंजे मानधन अशा कात्रीत अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडीसेविका व मदतनीस सापडल्या आहेत. तुटपुंजे मानधन असल्यामुळे संसाराचा गाडा चालवायचा कसा, हा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर आहे. अनेकदा आंदोलने करूनही शासनाने दखल घेतली नसून आता मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संपावर कायम राहण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. या संपामुळे ६ महिने ते ३ वर्षे वयोगटांतील लाभार्थ्यांना आहार व आरोग्य, आहार व अनौपचारिक शिक्षण मिळत नाही. किशोरवयीन मुली, गर्भवती व स्तनदा मातांना आरोग्याची सेवा मिळत नाही. त्यामुळे लाभार्थी आहार, आरोग्यापासून वंचित आहेत.

सर्वसामान्यांना आरोग्यसेवा, पोषक आहार पुरवण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे. अंगणवाडी सेविका चार तासांची सेवा देत असल्याचे शासनाचे म्हणणे आहे; परंतु विविध प्रकारची कामे अंगणवाडी सेविकांकडे सोपवली जात असल्यामुळे दिवसभर काम करावे लागते. तुलनेत मानधन मिळत नाही, अशी अंगणवाडी सेविकांची भूमिका आहे.

RELATED ARTICLES

Most Popular