28.9 C
Ratnagiri
Monday, December 9, 2024

Huawei च्या Mate 70 मालिकेला प्रचंड मागणी, 67 लाखांहून अधिक युनिट्सचे बुकिंग

चीनी स्मार्टफोन निर्माता Huawei ने गेल्या महिन्यात...

शाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात

तृप्ती डिमरीचा यशस्वी प्रवास - तृप्ती डिमरीने...

IND vs AUS दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव

ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात...
HomeChiplunचिपळुणात रोखले गॅस पाइपलाइनचे काम

चिपळुणात रोखले गॅस पाइपलाइनचे काम

खोदलेल्या भागावर त्वरित पॅचवर्क केले जात नाही.

शहरात गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी संबंधित खासगी कंपनीकडून रस्त्याच्या खोदाईला सुरवात झाली असता तेथे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत काम थांबवले. खोदलेल्या भागावर त्वरित पॅचवर्क केले जात नाही. संबंधित कंपनीने पालिकेकडे सुमारे ७६ लाखांचा निधी जमा करूनही त्याची निविदा जाहीर झालेली नाही. त्यामुळे खराब रस्त्याचा फटका नागरिकांना बसणार असल्याने हे काम रोखण्यात आले. निविदा जाहीर करून ठेकेदाराची नियुक्ती झाल्यानंरच कामाला सुरवात करावी, अशी मागणी करण्यात आली. शहरातील शिवाजीनगर बसस्थानक ते जिप्सी कॉर्नर व्हाया अभिषेक हॉटेल गल्ली ते बहादूरशेख नाका या भागात भविष्यातील रस्ता रूंदीकरण केले जाणार आहे.

तरी देखील खासगी कंपनीच्या गॅस लाईनकरिता पालिकेने रस्ता खोदण्याची मान्यता दिली. त्यामुळे ही परवानगी देणे म्हणजे भविष्यात रस्ता रूंदीकरण न होण्यासारखे असल्याचा आक्षेप शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी घेतला. जिप्सी कॉर्नर ते बहादूरशेख नाका या भागात तसेच अन्य उपनगरातील गल्ल्या या रूंदीकरणात आहेत. सद्यःस्थितीला सांस्कृतिक केंद्र ते बहादूरशेख नाका या भागातून जाताना प्रवासी किंवा शहरवासियांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागतो. यावर उपाय शोधणे गरजेचे आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून सर्व ट्रॅफिक कराड रोड काविळतळी भागातून होत आहे. शहरातील गॅस पाइपलाइन टाकण्यास नागरिकांचा विरोध नाही; परंतु खराब झालेला रस्ता त्वरित दुरुस्त होत नाही म्हणून जनतेने हे काम थांबवले आहे. जनतेतून विरोध होतो. याबाबत पालिकेने भूमिका स्पष्ट करावी. संबंधित कंपनीने 75 लाख 80 हजार रुपये पालिकेत भरले आहेत. आठ महिने झाले तरी पालिकेने त्यावर अंदाजपत्रक करून निविदाप्रक्रिया राबवून ठेकेदाराची नेमणूक केलेली नाही. त्यामुळे ही प्रक्रिया राबवल्यानंतर कामाला सुरवात करावी. घरपट्टीचा मुद्दा पालिकेने निकालात काढलेला नाही.

घरपट्टी भरण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करावे. उशिरा घरपट्टी भरली तर नागरिकांना दंड लागू शकतो यासाठी पालिकेने निर्णय घ्यावा. गॅस लाईनबाबत, घरपट्टीबाबत नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले जावेत, अशी भूमिका शिवसेनेने मांडली. या वेळी शहरप्रमुख शशिकांत मोदी, विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, पंचायत समितीचे माजी सदस्य राकेश शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, माजी नगराध्यक्षा आदीती देशपांडे, भाजप शहराध्यक्ष श्रीराम शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular