29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

चिपळूण घरकुलाचे स्वप्न जमीनदोस्त, तहसीलदारांकडे तक्रार

तालुक्यातील कादवड-सुतारवाडी येथील शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या...

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कन्या एक्स्प्रेसमध्ये तरुणीचा धिंगाणा, प्रवासी हैराण

कोकण रेल्वेमधील एसी डब्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या...

दुर्गम भागासाठी हवी स्वतंत्र संचमान्यता – मुख्याध्यापक संघाची मागणी

शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या संचमान्यता निर्णयामुळे...
HomeRatnagiriउदय सामंत हे केवळ निरोद्योग मंत्री: विनायक राऊत

उदय सामंत हे केवळ निरोद्योग मंत्री: विनायक राऊत

सरकारने महानंदा प्रकल्पही गुजरातच्या अमूलला देण्याचा घाट घाटला आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत हे केवळ निरोद्योग मंत्री आहेत. राज्यातील प्रकल्प गुजरातला पाठवण्यापलिकडे त्यांनी काही केलेले नाही. हुजुरेगिरी करण्यापलीकडे त्यांनी काही केले नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत रत्नागिरी आणि सावंतवाडीतील आमदारांना महाविकास आघाडी घरी बसवल्याखेरीज राहणार नाही, असा ठाम विश्वास उबाठाचे उपनेते आणि खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. रत्नागिरी दौऱ्यावर पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले, ‘राज्याच्या उद्योगमंत्र्यांना स्वतःच्या मतदारसंघातील जेके फाईस् प्रकल्प टिकवता आला नाही आणि पाणबुडी प्रकल्प आदित्य ठाकरेंमुळे गेला, असे म्हणत असतील तर त्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही. महाराष्ट्राचे भूषण म्हणून महानंदा प्रकल्पाकडे पाहिले जात.

आज या सरकारने महानंदा प्रकल्पही गुजरातच्या अमूलला देण्याचा घाट घाटला आहे. महानंदा डेअरीपेक्षा त्याची मालमत्ता असलेल्या शेकडो एकर जागेवर डोळा असून, ती अमूलच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे. राज्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि आघाडीने राज्यातील जनतेचा विश्वास जिंकला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ३० खासदार निवडून येतील आणि विरोधकांचे दावे फोल ठरतील. आगामी विधानसभा निवडणुकीतही रत्नागिरी आणि सावंतवाडीतील आमदारांना घरी बसवून ठाकरे आणि महाविकास आघाडीचे आमदार निवडून येतील, असे चित्र आहे. महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी गट, शिंदे गट आणि भाजप एकमेकांच्या उरावर बसून एकमेकाला संपवतील, असे भाकीतही विनायक राऊत यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular