27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeKhedचोरीच्या दागिन्यांवर उचलले २८ लाखांचे कर्ज

चोरीच्या दागिन्यांवर उचलले २८ लाखांचे कर्ज

पोलिसांनी तत्काळ संबंधित बँकेकडून हे दागिने जप्त केले.

काका, बहीण व आत्त्याच्या घरी डल्ला मारणाऱ्या तरुणाला येथील पोलिसांनी तीन चोरी प्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून तब्बल १२ लाख रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. विशेष म्हणजे या चोरट्याने हे दागिने सोने तारण करणाऱ्या एका खासगी फायनान्स कंपनीत तारण ठेवून सुमारे २८ लाख कर्जाची उचल केली होती. या चोरट्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती, मात्र बुधवारी त्याला दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली आहे. कापसाळ येथील ओंकार अनिल साळवी असे या तरुणाचे नाव आहे. नातेवाइकांकडे राहिल्यानंतर त्यांच्याशी जवळीक साधून त्याचा फायदा ओंकार साळवी नेहमी उठवत होता. पाहुणा म्हणून आलेला ओंकार घरच्याप्रमाणे सर्वत्र राहत होता, मात्र त्या कालावधीत त्याचा डोळा त्या त्या घरातील दागिन्यांवर होता.

दागिने कुठे ठेवले जातात, कपाटाची चावी कुठे ठेवली जाते, याची पुरेपूर माहिती घेतल्यानंतर घरी कोणी नसताना तो दागिन्यांवर हात मारत होता. त्यातून त्याने नात्यातील काका, बहीण, आत्या यांच्या घरी चोरी केली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. कापसाळ गावीदेखील त्याने चोरी केल्याचे प्रकार उघडकीस येताच त्याला चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याची कसून चौकशी केल्यानंतर चिपळूण शहरातील एका सोने तारण करणाऱ्या खासगी फायनान्स कंपनीत चोरीचे दागिने गहाण ठेवून २८ लाखांच्या कर्जाची उचल केल्याची धक्कादायक प्रकार पुढे आला. पोलिसांनी तत्काळ संबंधित बँकेकडून हे दागिने जप्त केले. सुमारे १२ लाख ५० हजार रुपये इतक्या किमतीचे दागिने त्याने चोरले असून त्यातील ११ लाख ३३ हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

कापसाळ दुकानखोरी येथील अमोल साळवी यांचे ५ लाख ८ हजाराचे, जयश्री अवधूत साळवी यांचे ५ लाख ३६ हजार, स्नेहल सचिन सावंत हिचे २ लाख ३६ हजाराचे दागिने चोरीला गेले होते. हे दागिने ओंकार अनिल साळवी (२८, रा. दुकानखोरी, कापसाळ) यानेच चोरल्याचे स्पष्ट झाले. नातेवाईकांच्या घरातच चोरी केल्या प्रकरणी ओंकार साळवीला मुंबईत साकीनाका पोलिसांनी त्याला अटक केली होती. या प्रकरणी पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संजय पाटील, पोलिस उपनिरीक्षक शाम आरमाळकर, पूजा चव्हाण, अरुण जाधव, पोलिस हवालदार संतोष शिंदे, पाडुरंग जवरत, वृक्षाल शेटकर, संदीप मांडके, हेड कॉन्स्टेबल प्रमोद कदम, गणेश पडवी, कृष्णा दराडे यांनी कामगिरी पार पाडली.

खडा न् खडा माहिती पाहुणा म्हणून आलेला ओंकार साळवी घरच्याप्रमाणे राहत होता. मात्र त्या कालावधीत त्याचा डोळा दागिन्यांवर होता. दागिने कुठे ठेवले जातात, कपाटाची चावी कुठे ठेवली जाते, याची पुरेपूर माहिती घेतल्यानंतर घरी कोणी नसताना तो दागिन्यांवर हात मारत होता. त्यातून त्याने नात्यातील काका, बहीण, आत्या यांच्याच घरी चोरी केली होती. त्याची कसून चौकशी केल्यानंतर चिपळूण शहरातील एका खासगी फायनान्स कंपनीत चोरीचे दागिने गहाण ठेवून २८ लाख कर्जाची उचल केल्याची धक्कादायक प्रकार पुढे आला. पोलिसांनी तत्काळ संबंधित बँकेकडून हे दागिने जप्त केले.

RELATED ARTICLES

Most Popular