26.8 C
Ratnagiri
Tuesday, September 2, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriरत्नागिरीत कोकण विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेचे महसूल मंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन

रत्नागिरीत कोकण विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेचे महसूल मंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन

विजेत्यांना महसूलमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२३- २४ चे उद्घाटन क्रीडाज्योत प्रज्ज्वलित करून आणि रंगीत फुगे हवेत सोडून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, महसूलचे अप्पर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, आयकर विभागाच्या आयुक्त डॉ. माधवी, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, आदी उपस्थित होते. याप्रसंगी मंत्री विखे-पाटील म्हणाले, विभागीय क्रीडा स्पर्धा भरवण्याची चांगली परंपरा महसूल विभागाने राखली आहे. यातून अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकमेकांशी ओळख होऊन संबंध अधिक दृढ होतील. त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळेल. आमदार जाधव म्हणाले, महसूल विभागाने देशाची यंत्रणा मजबूत केल्याचे सांगून रत्नागिरी जिल्ह्याला प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळावा, अशा शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांस पुष्पहार अर्पण करण्यात आला. खेळाडूंनी संचलन करून मानवंदना दिली. प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी खेळाडूंना शपथ दिली. या निमित्ताने झालेल्या संचलनात रत्नागिरीने प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक रायगडने आणि तृतीय क्रमांक मुंबई उपनगरने मिळवला. १०० मीटर धावणेमध्ये पुरुषांमध्ये रत्नागिरीने प्रथम, सिंधुदुर्गने द्वितीय आणि रायगडनें तृतीय क्रमांक मिळवला. महिला १०० मीटर धावणेत रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. विजेत्यांना महसूलमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. नासा व इस्रोसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular