27.7 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeChiplunपरशुराम घाटातील वाहतुकीचा गुंता सुटला

परशुराम घाटातील वाहतुकीचा गुंता सुटला

परशुराम घाटातील बहुतांशी काम पूर्ण होत आले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटाच्या पायथ्याला फरशीतिठा येथे भुयारी मार्गासाठी भराव केल्याने सातत्याने वाहतूककोंडी होत होती; मात्र आता भुयारी मार्गावरून चौपदरीकरणातील एकेरी मार्ग सुरू झाल्याने येथील वाहतूककोंडी सुटण्यास मदत झाली आहे. मात्र, नव्या मार्गावर एसटी बसथांबा उपलब्ध नसल्याने लोटे औद्योगिक वसाहतीतील कामगारांसह विद्यार्थ्यांचीही मोठी गैरसोय होत आहे. गेल्या काही वर्षांपासून परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम तापदायक ठरले. सतत दरडी कोसळण्याचा घटना व रस्त्यावर माती आल्याने बऱ्याचदा हे काम थांबवावे लागले होते.

काम सुरू असताना अपघातही घडले. मात्र, आता या सर्व अडचणींवर मात करत परशुराम घाटातील बहुतांशी काम पूर्ण होत आले आहे. दोन्ही मार्गावरील काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर आता डोंगराच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू आहे. परशुराम घाटातील अतिशय धोकादायक टप्याच्या ठिकाणी हे काम धिम्या गतीने सुरू आहे. त्याशिवाय घाटात मध्यवर्ती ठिकाणी काँक्रिटीकरणाचा काही भाग खचल्याने तो ब्रेकरने तोडून दुरुस्ती केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular