24.1 C
Ratnagiri
Wednesday, February 5, 2025

ना. नितेश राणे आता भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री...

पुन्हा केवायसीचा कार्डधारकांमागे ससेमिरा, शिधापत्रिकाधारकांतून नाराजी

रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून...

पालू लघुपाटबंधारे योजनेला मंजुरी, किरण सामंत यांचा पुढाकार

उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या...
HomeRatnagiriलांज्यात आज ठाकरे गटाचे उपोषण, आ. साळवींनी आणलेला विकासनिधी अन्यत्र वळवला ?

लांज्यात आज ठाकरे गटाचे उपोषण, आ. साळवींनी आणलेला विकासनिधी अन्यत्र वळवला ?

९ कोटींच्या विकास कामांचा निधी.

शहरातील विविध विकास काम ांसाठी आमदार राजन साळवी यांनी आणलेला सुमारे ९ कोटींच्या विकास कामांचा निधी शिंदे गटाचे नगराध्यक्ष व नगरपंचायत प्रशासनाने केवळ राजकीय सुडबुद्धिने व सदस्य संख्येच्या बळावर अन्य प्रभागात वळवून प्रभागातील विकास कामांना खीळ घालण्याचा निंदनीय प्रकार केल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला आहे. या विरोधा सकाळी ९.३० वाजता लांजा तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक व शहरप्रमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लांजा नगरपंचायत प्रशासन व नगराध्यक्ष यांच्या विरोधात या अगोदर १५ ऑगस्ट २०२३ रोजी पुकारलेल्या उपोषणाच्या पूर्वसंध्येला नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी पुढील दोन महिन्यांत सदरह विकासकामे फेरबदल न करता पुर्ण केली जातील असे आश्वासन दिल्याने नगराध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात पुकारलेले उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.

परंतु त्यानंतर दिलेल्या मुदतीत कामांच्या संदर्भात अचानक फेरबदल करून नगराध्यक्ष आणि प्रशासन यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती न देता केवळ राजकीय सुडबुद्धिने आणि अनास्थेपोटि सदरहू मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांचा निधी शासकीय यंत्रणेचा वापर करून परस्पर संगनमताने बदलून मंजूर विकास निधी पळवून नेल्याचा आरोप नगरसेवक व शहरप्रमुख यांनी यावेळी केला. या सर्व प्रकरणाची पोलखोल करण्यासाठी आमदार राजन साळवी यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तसेच महाविकास आघाडी सोबत पक्षाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, तालुका कार्यकारिणी, शहर कार्यकारिणी, सदस्य उपोषण छेडणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular