21.1 C
Ratnagiri
Saturday, February 24, 2024

सुक्या काजू बियांचे दरही गडगडले,वातावरणाचा परिणाम

प्रतिकूल आणि ढगाळ हवामान, सकाळच्या सत्रामध्ये दाट...

काजरघाटी-धारेवर ब्राऊन शुगर विकणाऱ्याला अटक

शहरालगतच्या वर्दळीचे ठिकाण असलेल्या काजरघाटी- धारेवर ब्राऊन...
HomeRatnagiriअंगणवाड्यांची ८६८ कुलुपे दीड महिन्यांनंतर उघडली

अंगणवाड्यांची ८६८ कुलुपे दीड महिन्यांनंतर उघडली

गेल्या आठवड्यात शासनाने त्यांना नोटीस देत त्वरित कामावर हजर राहण्याचे आदेश दिले.

गेल्या दीड महिन्यापासून अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे, परंतु गेल्या आठवड्यात शासनाने त्यांना नोटीस देत त्वरित कामावर हजर राहण्याचे आदेश दिले. त्यानुसार गेल्या आठवड्यात ७०० सेविका हजर झाल्या. आता मात्र यामध्ये वाढ झाली असून बुधवारपर्यंत १ हजार ४३४ अंगणवाडी कर्मचारी अंगणवाड्यांमध्ये कार्यरत झाल्या तर अजूनही ३ हजार ६०२ अंगणवाडी कर्मचारी संपात ठाम राहिल्या आहेत. यामुळे दोन हजार ९६९ पैकी सध्या ८६८ अंगणवाड्यांना लागलेली कुलुपे उघडली आहेत.

गेल्या डिसेंबरपासून पुकारलेल्या बेमुदत संपाची अजूनही शासनस्तरावर दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात २ हजार ९६१ अंगणवाड्यांना लागलेले कुलूप लागले होते. या बेमुदत संपाचा परिणाम बालके पोषण आहारापासून वंचित राहिल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. त्याची दखल एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल बांनी घेतली आहे. ग्रामपंचायतीच्या अंगणवाड्यांचा पंचनामा करून सहाय्याने पर्यवेक्षिकांनी तत्काळ चाख्या ताब्यात घ्याव्यात, असे आदेश दिले आहेत. या संपामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाड्यांतील सुमारे ३० हजाराहून अधिक बालके पोषण आहारापासून वंचित राहिली आहेत

RELATED ARTICLES

Most Popular