28.9 C
Ratnagiri
Tuesday, November 25, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriकोकण रेल्वे मार्गावरुन धावणार अयोध्येसाठी विशेष गाडी

कोकण रेल्वे मार्गावरुन धावणार अयोध्येसाठी विशेष गाडी

गोव्यातील वास्को जंक्शन येथून अयोध्येला जाणारी विशेष गाडी सुटणार आहे.

कोकण रेल्वेच्या प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १२ फेब्रुवारीला अयोध्येकडे जाणारी पहिली विशेष गाडी धावणार आहे. देशातील ६६ रेल्वे स्थानकांवरून आयआरसीटीसीमार्फत अयोध्या दर्शनासाठी ‘आस्था ट्रेन’ चालविल्या जाणार आहेत. गोव्यातील वास्को जंक्शन येथून १२ फेब्रुवारीला रात्री ९ वाजून १० मिनिटांनी अयोध्येला जाणारी विशेष गाडी सुटणार आहे.

मडगाव, थिवीम, कुडाळ, कणकवली, वैभववाडी, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, मराणगाव, रोहा, पनवेल, वसईमार्गे विशेष गाडी उत्तरप्रदेशातील अयोध्येकडे रवाना होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून असंख्य प्रवासी अयोध्येला जाण्यासाठी प्रतिक्षेत असलेली विशेष गाडीचे वेळापत्रक कोकण रेल्वेमार्फत जाहीर करण्यात आले आहे. अयोध्येत दर्शन घेतल्यानंतर प्रवाशांना पुन्हा मूळगावी पोहोचविण्यासाठी आयआरसीटीसीने पुढाकार घेतला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular