30.1 C
Ratnagiri
Sunday, May 19, 2024

चिपळूणला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी चिपळूण आणि...

कोकणातील तब्बल ६१३ गावे दरडीच्या सावटाखाली

कोकणातील शेकडो गावे आजही दरडींच्या सावटाखाली आहेत....

कोकणात वादळामुळे महावितरणला ५१ लाखांचा फटका

चिपळूण व गुहागर तालुक्यात झालेल्या वादळी वारा...
HomeMaharashtraमुंबईत शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला गोळ्या घातल्या!

मुंबईत शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला गोळ्या घातल्या!

पैशाच्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

कल्याणमधील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस स्थानकात गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी भरदिवसा मुंबईतील दहिसर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपूत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. मॉरिस नावाच्या एका व्यक्तीने समोरुन अभिषेक घोसाळकरांवर ५ गोळ्या झाडल्या. यातील ३ गोळ्या अभिषेक यांच्या शरीरात घुसल्या आणि ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. या गोळीबारानंतर मॉरिसने एक गोळी स्वतःच्या डोक्यात झाडली आणि आत्महत्या केली. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांना तातडीने करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

पैशाच्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. अधिक माहिती अशी की, अभिषेक घोसाळकर हे मुंबईतील त्यांच्या पक्षाच्या आदित्य ठाकरे वांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला गुरुवारी दुपारी गेले होते. अभिषेक घोसाळकर यांना तेथे एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांना कार्यालयात बोलावून घेतले. मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा फोन केल्याचे कळते. मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांच्यात गेले काही दिवस वाद सुरू होते. फोनवरुन मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना स्वतःच्या कार्यालयात बोलावून घेतले. पैशावरुन वाद झाले आणि त्यानंतर मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर समोरुन पाच गोळ्या झाडल्या.

३ गोळ्या घुसल्या – त्यातील ३ गोळ्या अभिषेक नोसाळकर यांना लागल्या. एक गोळी डोक्यात घुसली. रक्ताच्या थारोळ्यात अभिषेक घोसाळकर कोसळले. त्यानंतर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिसने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. दरम्यान, अभिषेक घोसाळकर यांना तातडीने मुंबईतील करुणा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीरच होती. रात्रौ ९.३० वा.च्या सुमारास उपचारादरम्यान अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू ओढवल्याची माहिती पोलिसांनी दिली.

स्वयंघोषित नेता – मॉरिस या व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. दहिसर-बोरिवली परिसरात मॉरिस एक स्वयंसेवी संस्था चालवतो. स्थानिक राजकीय वर्तुळात मॉरिस नार्वाच्या व्यक्तीला स्वयंघोषित नेता म्हणून ओळखले जाते. गणपत पाटील नगरमध्ये मॉरिस काम करतो. अभिषेक घोसाळकर आणि त्याच्यामध्ये पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद होते. त्यातूनच त्याने हा गोळीबार केल्याची माहिती पुढे आली आहे.

फडणवीस राजीनामा द्या! – या खुनानंतर शिवसेनेचा ठाकरे गट कमालीचा आक्रमक झाला आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून गुंडशाही सुरू आहे. सत्ताधारी पक्षाचा आमदारच पोलीसस्थानकात गोळीबार करतो. राज्यातील कायदा व सुव्यस्थेचे यापेक्षा दिवाळे आणखी काय वाजणार असा सवाल करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी खा. संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. दहीसरमध्ये तातडीने कलम १४४ जारी करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular