शहरात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. एका रात्रीत माळनाका परिसरातील चार दुकाने चोरट्यांनी फोडली. दोन फोडण्यात त्यांना यश आले, तर दोन फोडण्याचा प्रयत्न झाला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत कोणतीही तक्रार दाखल झालेली नव्हती. चोरटे मात्र सीसीटीव्हीत कैद झाले असून, शहर पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत आहे. संपूर्ण रत्नागिरी शहर सीसीटीव्हीच्या निगराणीत आहे. ५६ सीसीटीव्हीचे जाळे शहरात पसरले आहे, त्याचे नियंत्रण कक्ष पोलिस मुख्यालयाजवळ आहे. त्यामुळे दिवसा व रात्री-अपरात्री शहरात होणाऱ्या हालचालीवर पोलिसांचे बारीक लक्ष असते, तसेच पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली आहे.
याचा चांगला परिणाम दिसू लागला असून, यामुळे चोरट्यांचा चांगलाच बंदोबस्त झाला होता, गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटना घटल्या नव्हत्या; परंतु चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले असून, एका रात्रीत चार बोऱ्या केल्या. अतिथी भोजनालय फोडण्याचा प्रयत्न झाला. महाराजा इलेक्ट्रॉनिक, समर्थ कृपा जनरल स्टोअर आणि चोरी झाली. द्वारकामाई हॉटेलमध्ये मात्र, चोरट्यांच्या हाती जास्त काही लागले नाही; परंतु चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत; मात्र चोरट्यांनी अंगभर कपडे घातले होती आणि कानटोपीने तोंडही झाकले होते. याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक महेश तोरसकर आणि सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला; मात्र उशिरापर्यंत कोणी तक्रार दाखल केली नव्हती.