दापोली मतदारसंघातील जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत कधी नव्हे इतका कोट्यावधींचा निधी मला आणण्यात यश आले असून आज आपण पाहिल, तर एकही गाव अगर वाडी विकासापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही आ. योगेश कदम यांनी दिली आहे. पुढील काळात विकासकामांबरोबरच, तरुणांना नोकरी, महिला बचतगटांना प्राधान्य, शेतीपूरक व्यवसायाला चालना देऊन दापोली मतदारसंघाचा सर्वांगिण विकास कसा होईल, यासाठी आपण प्रयत्नशील असे देखील त्यांनी सांगितले. ते उन्हवरे विभागातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी दामिळ भोईवाडी येथे झालेल्या सभेत बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सरकार आपले आहे, त्यामुळे मी जे काम सूचवेन ते पूर्ण होत आहे. या सत्तेचा फायदा मी माझ्या मतदारसंघातील जनतेसाठी सर्वोतोपरी करीत असून याकामी आपण कार्यकर्ते सदैव माझ्यासोबत पाठपुरावा करीत आहात. त्यामुळे याचे सारे श्रेय हे माझ्यासहीत तुम्हालाही जात आहे. आपण जो विश्वास माझ्यावर टाकला आहात तो अधिकचा वृध्दींगत करुया आणि पुढील काळात दापोली मतदारसंघ व संपूर्ण महाराष्ट्र आदर्शवत बनवू या, असा मानसही त्यांनी व्यक्त केला.
असोंड उर्फी बोरीचा कोंड ते कोळबांद्रे रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ८०.७५ लाख, दाभीळ तांबडी मुख्य रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ५० लाखांच्या कामाचे भूमिपूजन, दामिळ साळीवाडी रस्ता डांबरीकरण ७ लक्ष कामाचे उद्घाटन, दाभिळ बौध्दवाडी रस्ता डांबरीकरण १० लक्ष कामाचे उद्घाटन, दाभीळ डांबूकवाडी रस्ता डांबरीकरण १० लक्ष कामाचे उद्घाटन, दाभिळ भोईवाडी रस्ता १० लक्ष डांबरीकरण कामाचे भूमिपूजन, देगाव पांगारी मुख्य रस्ता १ कोटी १० लक्ष डांबरीकरण काम ाचे उद्घाटन, देगाव मुख्य रस्ता ते बामणेवाडी करंजाळी रस्ता १ कोटी ३८ लक्ष कामाचे भूमिपूजन अशी उन्हवरे विभागात कोट्यवधी रुपयांच्या कामाची भूमिपूजने व उद्घाटने आ. योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळी विभागात आ. योगेश कदम यांची ढोल- ताशांच्या व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उन्मेश राजे, प्रभाकर गोलांबडे, अनंत करबेले, ममता शिंदे, वृषाली सुर्वे, अंजली भागणे, नरेश घरटकर, प्रकाश कालेकर, सुनिल दळवी, मोहन भागणे, सुमित जाधव, धोंडू नाचरे, सुनिल चव्हाण, प्रणिल कांबरे, धोंडू शिगवण, रेखा खोपटकर, अनुराधा भोसले, जनार्दन बामणे, जनार्दन म ांजरेकर, असलम दळवी, फातीमा मोहिमतुले, अनिकेत वानरकर, नदीम मुकादम, आर. आर. जाधव, विश्वास खांबे, संदीप मांडवकर, रमेश शिंदे, जानू अवेरे, अनंत कातकर, दिनेश खळे, महेंद्र खळे, शांताराम मोहिते, शंकर मांजरेकर, प्रविण खापरे, रमेश नाचरे, रेश्मा नेवरेकर, संतोष बामणे, अशोक बामणे आदी अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ व बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.