26.4 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeRajapurवानरांच्या त्रासामुळे रेशीम शेतीवर पाणी, शेतकरी त्रस्त

वानरांच्या त्रासामुळे रेशीम शेतीवर पाणी, शेतकरी त्रस्त

तुतीचा हिरवा पाला नसल्यामुळे कोषनिर्मितीची बॅच घेणे मुश्कील झाले आहे.

तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी तुती लागवड अन् रेशीम शेतीचा प्रयोग केला आहे. त्यामध्ये रोपांची लागवड, ठिबक सिंचन आणि इमारत बांधकामावर लाखो रुपयांचा खर्च केला आहे; मात्र वानरांच्या त्रासामुळे रेशीम शेतीतून उत्पन्न मिळण्याच्या शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले आहे. उत्पन्न मिळणार नसेल तर शेती करायची कशासाठी, असा प्रश्न भालावली येथील शेतकरी अनंत खानविलकर यांनी उपस्थित केला आहे. तालुक्यातील भालावली येथील खानविलकर यांची वडिलोपार्जित शेती असून, गेली अनेक वर्षे ते शेती करत आहेत.

भातशेतीसह हापूस आंबा, काजू, सुपारी यांचीही त्यांनी लागवड केली आहे. गेली काही वर्षे वातावरणातील बदलामुळे फळबागायतीसह शेतीमधील उत्पन्न कमी आणि खर्च अधिक जादा अशी स्थिती झाली आहे. दुसऱ्या बाजूला फळबागायती आणि भातशेतीमध्ये वर्षातून एकदा उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्याच्या उद्देशाने गतवर्षी तुती लागवड करून रेशीम शेती करण्याचा निर्णय खानविलकर यांनी घेतला. एक एकर क्षेत्रात सुमारे पाच हजार तुतीच्या रोपांची लागवड केली.

पाणीपुरवठ्यासाठी ठिबक सिंचन आणि कोषनिर्मितीसाठी प्रशस्त इमारतही बांधली; मात्र रोपांची वाढ झाल्यानंतर वानरांच्या झुंडीच्या झुंडी शेतामध्ये घुसून हिरवा पाला खात आहेत. सोबत रोपांची नासधूस करत आहेत. वानरांच्या या उपद्रवामुळे उभ्या रोपांवर हिरवा पालाच राहिलेला नाही. तुतीचा हिरवा पाला नसल्यामुळे कोषनिर्मितीची बॅच घेणे मुश्कील झाले आहे. तुतीची लागवड करणाऱ्या अन्य शेतकऱ्यांनी आजपर्यंत दोन-तीन बॅचमधून उत्पन्न घेतले. मात्र, रोपांवर पाला नसल्याने आपणाला एकदाही कोषनिर्मितीची बॅच घेऊन उत्पन्न घेता आले नसल्याचे खानविलकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular