27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

वादळी वाऱ्यासंह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला...

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....
HomeRatnagiriव्हिस्टाडोम'ने रेल्वेच्या तिजोरीत २१ कोटी, पर्यटकांसह प्रवाशांचा वाढता प्रतिसाद

व्हिस्टाडोम’ने रेल्वेच्या तिजोरीत २१ कोटी, पर्यटकांसह प्रवाशांचा वाढता प्रतिसाद

व्हिस्टाडोम डब्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी तसेच तेजस एक्स्प्रेसला जोडलेल्या पर्यटनपूरक व्हिस्टाडोम कोचला पर्यटकासह प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्यामुळे रेल्वेच्या तिजोरीत कोट्यवधीचा महसूल जमा होत आहे. एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत मध्य रेल्वेच्या गाड्यांच्या व्हिस्टाडोम डब्यांमधून २१ कोटी ९५ लाखांचा महसूल मिळाला असून, त्यात कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या गाड्यांमधून सुमारे ११ कोटींचा महसूल मिळाला आहे. मध्यरेल्वेवरील व्हिस्टाडोम डब्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने ते लोकप्रिय होत आहेत.

मुंबई-गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची चित्तथरारक दृश्ये असोत किंवा मुंबई-पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची नयनरम्य दृश्ये असोत, काचेचे टॉप आणि रूंद खिडक्या असलेले हे डबे लोकप्रिय ठरले आहेत. एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत मध्यरेल्वेच्या गाड्यांवर धावणाऱ्या व्हिस्टाडोम डब्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेसमधून २६ हजार २६९ लोकांनी प्रवास केला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेसचा २५ हजार ६४४ प्रवासी, मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीनचा २५ हजार ३० प्रवाशांनी लाभ घेतला.

मुंबई-करमाळी २४ हजार ३१ प्रवासी तर मुंबई तेजस एक्स्प्रेस आणि पुणे सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेसमधील डब्यांचा २० हजार २७२ प्रवाशांनी लाभ घेतला. तेजसमधून ६ कोटी १८ लाख, जनशताब्दीमधून ५ कोटी १४ लाख, पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दीमधून ४ कोटी १६ लाख, डेक्कन क्वीनमधून २ कोटी २९ लाख, मुंबई- पुणे एक्स्प्रेसमधून २ कोटी २० लाख तर डेक्कन एक्स्प्रेसमधून १ कोटी ९८ लाखाचा महसूल मिळाला. मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये व्हिस्टाडोम कोच पहिल्यांदा मध्यरेल्वेवर सादर करण्यात आले. प्रवाशांच्या प्रचंड मागणीमुळे, मुंबई-मडगाव मार्गावरील दुसरा व्हिस्टाडोम कोच १५ ऑक्टोबर २०२२ पासून तेजस एक्स्प्रेसला जोडण्यात आला. या डब्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे हे डबे मुंबई- पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये सुरू करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular