27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeChiplunसावर्डेसह टेरवला पाणीटंचाईच्या झळा

सावर्डेसह टेरवला पाणीटंचाईच्या झळा

डेरवण धरणात पाणी नसल्याने सावर्डेत भीषण पाणीटंचाईची समस्या आहे.

गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने यावर्षी तालुक्यात टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तालुक्यात सावर्डे, टेरव आणि कादवड ग्रामपंचायतीने टँकरची मागणी प्रशासनाकडे केली आहे. गेल्या काही दिवसांपासून टँकरची मागणी होत असली तरी अद्याप टंचाईग्रस्त सावर्डे आणि टेरवला टँकर सुरू झालेला नाही. पाणीपुरवठा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. गेल्या ३० वर्षांच्या कालावधीत गावोगावी पाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्या असल्या तरी पाणीटंचाई संपुष्टात आलेली नाही. तालुक्यातील पूर्व विभागातील अनेक गावांना टंचाईच्या झळा बसतात. तीन वर्षांपूर्वी तिवरे धरण फुटले.

अद्याप त्याची उभारणी झाली नसल्याने तिवरे नदीवर अवलंबून असलेल्या गावांनाही टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. गतवर्षी तालुक्यातील टंचाईग्रस्त १७ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. यामध्ये अडरे, कामथेखुर्द, कोसबी, नारदखेरकी, रिक्टोली, कळकवणे, कळंबट, नांदगाव खुर्द, तिवडी, निवळी, शिरवली, सावर्डे, कादवड, गाणे, ओवळी, आकले व येगाव या गावातील काही वाड्यांचा टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यामध्ये सर्वाधिक ९ धनगरवाड्यांचा समावेश होता. गतवर्षी चिपळूण तालुक्याचा टंचाई आराखडा ७१.६० लाख तर यावर्षी आराखडा पावणेतीन कोटींवर पोहोचला आहे. यावर्षीच्या आराखड्यात टंचाईग्रस्त गावातील विंधन विहिरीत आडव्या बोअरवेल मारण्यावर भर देण्यात आला आहे.

डेरवण धरणात पाणी नसल्याने सावर्डेत भीषण पाणीटंचाईची समस्या आहे. आमदार शेखर निकम यांच्याच गावात लोकांना टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. त्यासाठी आमदार निकम यांनी डेरवण धरण दुरुस्तीसाठी १५ कोटींचा निधी मंजूर केला असून, मे महिन्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला आहे. दुसरीकडे टेरव येथील जलजीवनची पाणीयोजना अर्धवट आहे. त्यामुळे गावाला टंचाईच्या झळा बसत आहेत. कादवड येथील दोन्ही धनगरवाड्यांना टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे. पूर्व विभागात टंचाई जास्त दरवर्षी तालुक्यातील पूर्व विभागात टंचाईच्या झळा जास्त बसतात. पूर्व विभागातील रिक्टोली, तिवरे, तिवडी, कादवड, गाणे, ओवळी, आकले आदी गावांचा समावेश होतो. तिवरे धरण फुटल्याने गेल्या चार वर्षापासून त्याचा मोठा परिणाम जाणवू लागला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular