24.8 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeRatnagiriरत्नागिरी-सिंधुदुर्गवर भाजपचा दावा, कमळ निशाणीची भाषा व्यूहरचनेतूनच

रत्नागिरी-सिंधुदुर्गवर भाजपचा दावा, कमळ निशाणीची भाषा व्यूहरचनेतूनच

वर्षभरापासून नियोजनबद्ध प्रचार करत प्रत्येकवेळी या मतदारसंघावर पक्षाने दावा केला आहे.

भाजप-शिवसेना युतीच्या काळात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला; परंतु शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर भाजपने या व्यूहरचना करून आणि मतदारसंघाचा सर्व लेखाजोखा मांडून या मतदारसंघात कमळच फुलणार, असा दावा केला. साधारण गेल्या वर्षभरापासून नियोजनबद्ध प्रचार करत प्रत्येकवेळी या मतदारसंघावर पक्षाने दावा केला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, लोकसभा प्रभारी अतुल काळसेकर, लोकसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद जठार, लोकसभा सहप्रभारी आणि माजी आमदार बाळ माने यांनी सातत्याने हा मतदारसंघ भाजपच लढवणार असे ठासून सांगितले आहे. अजूनही उमेदवार जाहीर झाला नसला, तरी निशाणी कमळ असणार, असे संकेत मिळाले आहेत.

केंद्रात २०१४ पासून भाजपचे एनडीए सरकार सत्तेत आहे. सलग दोनवेळा सत्तेत आल्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. कोकणात पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेकडे असला, तरी पूर्वी भाजपचे आमदार, खासदार येथे सक्रिय होते. युतीच्या सत्ता समीकरणामध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. मुंबईचा चाकरमानी व कोकणचे आगळे नाते असल्याने कोकण व मुंबईत शिवसेना वरचढ आहे; परंतु दीड वर्षांपूर्वीच्या सत्तानाट्यामध्ये शिवसेनेचे दोन गट झाले. ठाकरे गट व शिंदे गटामुळे शिवसेनेची ताकद विभागली गेली आहे. शिवाय राष्ट्रवादीचेही शरद पवार गट व अजितदादा पवार यांचा गट असे दोन गट झाले.

यात अजितदादांचा गट महायुतीमध्ये सामील झाला. दादा मुख्यमंत्री झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची मतेसुद्धा महायुतीच्या उमेदवाराला मिळणार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहेत; परंतु त्यांना कमळाच्या निशाणीवर लढण्याची सूचना केल्याची चर्चा आहे. याला अधिकृत दुजोरा कोणी दिलेला नाही; मात्र गेल्या वर्षभरापासून ही निवडणूक लढवण्यास भाजपमध्ये अनेकजण इच्छुक आहेत. यात नारायण राणे, रवींद्र चव्हाण, बाळ माने, प्रमोद जठार यांच्या नावांची चचदिखील आहे. नीलेश राणे यांनी चार महिन्यांपूर्वीच माघार घेत विधानसभा लढवण्याचे मनसुबे जाहीर केले आहेत. नारायण राणे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे; परंतु अजून अधिकृत घोषणा झालेली नाही.

RELATED ARTICLES

Most Popular