22.8 C
Ratnagiri
Friday, January 3, 2025

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक ! राजन साळवी

'सरकार बदलले आणि मला दिलेली वाय प्लस...

मुंबईकर महिलांचा जबरदस्त पराक्रम स्थानिक व्यापाऱ्याला खरपूस चोप!

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत...

पालकमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच रत्नागिरीत सामंत X कदमांमध्ये चुरस?

२३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर...
HomeRatnagiriडिझेल विक्री बंद ठेवल्याने मच्छीमार संस्थांचा तोटा

डिझेल विक्री बंद ठेवल्याने मच्छीमार संस्थांचा तोटा

परिणामी संबंधीत पेट्रोलपंपधारकांना कारवाईसंदर्भात नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.

पेट्रोलपंपावरून ९ येणाऱ्या टँकरद्वारे मिरकरवाडा बंदरावर अनधिकृतपणे डिझेल विक्री होत आहे. त्याचवेळी मच्छीमार सहकारी संस्थांच्या नौका तपासणी होवून प्रमाणीत होत नाहीत, तोपर्यंत सहकारी संस्थांनी डिझेल वितरीत करू नये, असे सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाने कळविले आहे. डिझेल विक्री बंद ठेवल्याने मच्छीमार संस्थांचा तोटा होऊ लागल्याने राजीवडा महिला मच्छीमार सहकारी संस्थेने आक्रमक भूमिका घेतली आहे. परिणामी संबंधीत पेट्रोलपंपधारकांना कारवाईसंदर्भात नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. मिरकरवाडा बंदरावर गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोलपंपावरील टँकरने मच्छीमार नौकांना डिझेल विक्री केली जात आहे.

या संदर्भात राजीवडा महिला मच्छीमार सहकारी संस्थेने अनेकवेळा मिरकरवाडा प्राधिकरणासह सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाला चित्रिकरणाच्या पुराव्यासह तक्रार अर्ज दिले. परंतू बंदरावरील टँकरने होणारी डिझेल विक्री थांबली नाही. सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाकडून मच्छीमार सहकारी संस्थांना त्यांच्या पंपांवरून डिझेल वाटप बंद करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सहाय्यक मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडून संस्थांना पंत्र पाठवून मंजूर डिझेल कोट्याचे वाटप होण्यासाठी मच्छीमार नौकांची तपासणी केली जाणार आहे. ही तपासणी होईपर्यंत मच्छीमार संस्थांनी सदस्य मच्छीमार नौकांना डिझेलविक्री करू नये, असे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

एकिकडे बंदरावर बेकायदेशीररित्या टँकरने डिझेल विकले जात आहे. त्याचवेळी अधिकृत मच्छीमार संस्थांच्या पंट्रोलपंपवरून डिझेल देण्यास बंदी करण्यात आली आहे. मच्छीमार संस्थांचा व्यवसायच बंद झाल्याने राजीवडा महिला मच्छीमार संस्थेच्या अध्यक्षा तौफिका इफ्तिकार मजगावकर, उपाध्यक्षा मिराबाई गोपाळ खराटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त अभयसिंह इनाम दार-शिंदे यांची भेट घेवून आक्रमक भूमिका घेतली. कर्ज घेवून नौका बांधल्या गेल्या आहेत त्यांना सवलतीचे डिझेल मिळणे बंद केले आहे.

त्याचवेळी अनधिकृतपणे डिझेल विक्री करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? असा सवाल तौफिका मजगावकर यांनी उपस्थित केला. सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी मिरकरवाडा प्राधिकरणाचे प्रभारी अधिकारी तथा परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांना अखेर पेट्रोलपंपांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. ज्या पेट्रोल पंपांवरचे टँकर मिरकरवाडा बंदरावर येतात त्या पेट्रोलपंपधारकांना कारवाईसंदर्भात नोटीस काढण्यात ग्रेणार असल्याचे चिन्मय जोशी यांनी सांगितले असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा तौफिका मजगावकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular