29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कन्या एक्स्प्रेसमध्ये तरुणीचा धिंगाणा, प्रवासी हैराण

कोकण रेल्वेमधील एसी डब्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या...

दुर्गम भागासाठी हवी स्वतंत्र संचमान्यता – मुख्याध्यापक संघाची मागणी

शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या संचमान्यता निर्णयामुळे...

वाढत्या समस्यांनी रत्नागिरीकर त्रस्त, शहराच्या दुरवस्थेबाबत भाजप आक्रमक

शहरातील खड्डेमय रस्ते, अनियमित पाणीपुरवठा, गटारांची खराब...
HomeRatnagiri…तर बेरोजगारी कशी दूर होणार, प्रमोद जठार

…तर बेरोजगारी कशी दूर होणार, प्रमोद जठार

भाजपचे लोकसभा प्रभारी प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये ३० लाख लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, कोकण विकासाला चालना देताना येथे रोजगार निर्मिती करणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला महाविकास आघाडीचेच उमेदवार विनायक राऊत विरोध करीत आहेत. असे झाले तर बेरोजगारी कशी दूर होणार आणि कोकणचा विकास कसा होईल, असा प्रश्न भाजपचे लोकसभा प्रभारी प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला. भाजप तालुका संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार जठार बोलत होते.

यावेळी शिवसेनेचे (शिंदे गट) शहराध्यक्ष सौरभ खडपे, राजन बेतकर, भाजपचे नेते स्वप्नील गोठणकर, भाजपच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा शीतल पटेल, महिला तालुकाध्यक्ष सुयोगा जठार, श्रुती ताम्हणकर, आदी उपस्थित होते. यावेळी जठार म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार राऊत यांनी राहुल गांधी हेच पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचे सांगितले, तर संजय राऊत हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंतप्रधानाचे उमेदवार असल्याचे सांगतात.

महाविकास आघाडीत पंतप्रधान पदाच्या उमेदवारावरूनच संभ्रम आहे. महायुतीचे उमेदवर नारायण राणे यांनी कोकणच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले. ते निवडून आल्यास पुन्हा एकदा त्यांच्या माध्यमातून केंद्रात मंत्री म्हणून कोकणचे प्रतिनिधित्व मिळणार आहे. त्यातून निश्चितच कोकणच्या विकासाला चालना मिळले.

धनुष्यबाण गायब केल्याचा अपप्रचार – कोकणात सहा लोकसभा मतदारसंघ असून, त्या मतदारसंघांतील जागा वाटप करताना सर्व मित्रपक्षांना समान न्याय देण्यात आल्याचे भाजपचे लोकसभा प्रभारी प्रमोद जठार यांनी माहिती दिली. त्यात ठाणे, कल्याण आणि रायगडमधील मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेना (शिंदे गट), रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि पालघर मतदारसंघ भाजप आणि रायगड मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्यात आला. ही जागावाटप करताना महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. कोकणातून धनुष्यबाण गायब केल्याचा विरोधकांकडून केल्या जात असलेल्या अपप्रचाराला मतदारांनी बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

RELATED ARTICLES

Most Popular