मागच्या वर्षी गणेशोत्सवात सोशल मीडियावर एक गाणं तुफान गाजलं. या गाण्यानं सगळ्यांनाच भुरळ घातली, हे गाणं म्हणजे ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला. प्रदर्शित झाल्यानंतर एका वर्षांनी हे गाणं लोकप्रिय झालं ते साईराज केंद्रे या चिमुकल्यामुळं त्यानं या गाण्यावर एक रील केला होता. त्यानंतर रातोरात हे गाणं आणि त्याचं रील तुफान व्हायरल झालं. ज्याच्या त्याच्या मोबाईलवर हेच गाणं वाजत होतं. साईराज केंद्रेला या गाण्यामुळं रातोरात प्रसिद्धी मिळाली. मोठ्या कलाकारांपासून ते राजकारण्यांपर्यंत अनेकांनी त्याचं कौतुक केलं. त्यानंतर आता साईराजची लवकरच एका मालिकेत एंट्री होणार आहे.
त्याचा प्रोमो समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. साईराज केंद्रे हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळीचा राहणार आहे. पण सोशल मीडियामुळं आणि त्याच्यातील कलेमुळं तो लोकप्रिय झाला. ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या ३० सेकंदाच्या रिलमध्ये त्याचे हावभाव पाहून सगळेचा चकित झाले. हे रील हिट झाल्यानंतर साईराजा अनेक गाण्यातही झळकला. आता सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवल्यानंतर साईराज छोट्या पडद्यावर एंट्री घेणार आहे. एका लोकप्रिय मालिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याचा प्रोमो सध्या समोर आला आहे.
साईराज केंद्रे लवकरच ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेत झळकणार आहे. या मालिकेतील साईराजचा प्रोमो समोर आला आहे. साईराज ‘अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेत सात वर्षांचा लीप येणार असून आता. अप्पी आणि अर्जुनच्या आयुष्यातील पुढील प्रवास पाहायला मिळणार आहे. या मालिकेत अप्पी आणि अर्जुनचा मुलगा आता मोठा झालेला असून तो आता अप्पीसोबत सर्वांपासून दूर उत्तराखंडमध्ये राहताना दिसणार आहे. अप्पी आणि अर्जुनच्या याच मुलाची भूमिका साईराज केंद्रे साकारणार आहे.