31.3 C
Ratnagiri
Friday, May 24, 2024

रत्नागिरीजवळ अपघात रिक्षाचालकाचा मृत्यू

रिक्षाचे ब्रेक निकामी झाल्याने रिक्षा पलटी होऊन...

दापोलीतील महिलेच्या मृत्यूचे गूढ वाढले, नातेवाईकांना घातपाताचा दाट संशय

तालुक्यातील वणंद येथील ५० वर्षीय महिलेच्या मृत्यूचे...

महावितरणला ५७२ कोटीचा प्रकल्प मंजूर

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण योजनेतून...
HomeRatnagiriमूल विक्री प्रकरणात गुहागरचे दांपत्य ताब्यात

मूल विक्री प्रकरणात गुहागरचे दांपत्य ताब्यात

१४ बालकांची विक्री केल्याचे उघड झाल्याने आहे.

बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर एका मुलाची रत्नागिरी जिल्ह्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार तपासात पुढे आला आहे. याबाबात पोलिसांनी चौकशी केली असता गुहागर तालुक्यातील एका कुटुंबाने मुलाला विकत घेतल्याचे निष्पन्न झाले. मुंबई पोलिसांचे पथक काल गुहागरमध्ये येऊन संबंधितांना ताब्यात घेतल्याची खात्रिलायक माहिती असून, या प्रकरणाचे थेट रत्नागिरी कनेक्शन असल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी बालकांची विक्री करणाऱ्या महिला दलालासह एकूण सात संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

तसेच तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वंदना अमित पवार, शीतल गणेश वारे, स्नेहा सूर्यवंशी, नसिमा खान, लता सुरवाडे, शरद देवर आणि डॉ. संजय सोपानराव खंदारे यांचा समावेश आहे. सर्व संशयित आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये गुहागरमध्ये (जि. रत्नागिरी) एका कुटुंबाने बाळ विकत घेतल्याचे पुढे आल्यावर मुंबई पोलिसांचे पथक काल रत्नागिरीत येऊन संबंधितांना ताब्यात घेतल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.

मुलांची विक्री करणाऱ्या टोळीत एका डॉक्टरचाही समावेश आहे. फर्टिलिटी केंद्रामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या मदतीने रॅकेट चालवले जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. या टोळीने आतापर्यंत १४ बालकांची विक्री केल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यातील एक बाळ रत्नागिरी जिल्ह्यात विकल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली.

दोन मुलांची सुटका – संशयित आरोपींनी विक्री केलेल्या बालकांमध्ये ११ मुले, तर तीन मुली आहेत. कमीत कमी पाच दिवस ते जास्तीत जास्त नऊ महिने असे विक्री केलेल्या बाळांचे वय आहे. आतापर्यंत १४ लहान बाळांची विक्री झाल्याचे समोर आले असून, दोन बाळांची सुखरूप सुटका करण्यात मुंबई पोलिसांना यश आले.

RELATED ARTICLES

Most Popular