25.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRajapurनिसर्गाला अनुसरून चांगले उद्योग आणण्याचे फडणवीसांना साकडे

निसर्गाला अनुसरून चांगले उद्योग आणण्याचे फडणवीसांना साकडे

कोकणामध्ये रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प प्रस्तावित करू नयेत.

रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प प्रस्तावित न करता कोकणाच्या निसर्गाला अनुसरून चांगले उद्योग आणावेत, अशी विनंती रिफायनरीविरोधी संघटनेच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. प्रचारसभे निमित्ताने राजापूर दौऱ्यावर आले असता बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरीविरोधी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. प्रचारसभेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री फडणवीस नुकतेच राजापूर दौऱ्यावर आले होते.

यावेळी बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरीविरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे, उपाध्यक्ष कमलाकर गुरव, ज्येष्ठ कार्यकर्ते सूर्यकांत सोडये, सत्यजित चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी कोकणामध्ये रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प प्रस्तावित करू नयेत. त्याऐवजी कोकणाच्या निसर्गाला अनुसरून चांगले उद्योग आणावेत, त्याचे स्वागतच करू, असे सांगण्यात आले. तसेच बारसू, पन्हळे, गोवळ येथील दोनशेहून अधिक कातळशिल्पांचे गुगल नकाशावरचे स्थान मॅपवर दाखवून कातळशिल्प रक्षण व संवर्धन याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले.

नाटे, आंबोळगड किनारा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याने तोही संरक्षित करण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी फडणवीस यांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेले सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना संघटनेसोबत निवडणुकीनंतर बैठक आयोजित करण्याबद्दल सांगितल्याची माहिती संघटनेतर्फे देण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular