27.2 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriगृहमंत्री अमित शहा उद्या प्रथमच रत्नागिरीत

गृहमंत्री अमित शहा उद्या प्रथमच रत्नागिरीत

६ विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने रत्नागिरीत दाखल होणार आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे यांच्या प्रचारासाठी गृहमंत्री अमित शहा यांची तोफ धडाडणार आहे. अमित शहा सभेनिमित्त प्रथमच रत्नागिरीत येत असून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर २५ ते ३० हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विराट सभा होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री भाजप नेते ना. रवींद्र चव्हाण यांनी दिली केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या प्रचारासाठी यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राजापूर येथे सभा घेतली. आता अमित शहा येणार आहेत.

३ मे रोजी दुपारी १ वाजता ही सभा होणार आहे. या सभेकरिता मंडप व्यवस्था पूर्ण झाली आहे. या ठिकाणी सुमारे २५ ते ३० हजार लोक एका वेळेला बसू शकतील, एवढ्या क्षमतेचा मंडप उभारण्यात आला असून सभेनिमित्ताने गावोगावी संपर्क सुरू झाला आहे. महायुतीतील सर्व पक्षातले कार्यकर्ते, पदाधिकारी, नेतेमंडळी या सभेकरता उपस्थित राहणार आहेत. ६ विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने रत्नागिरीत दाखल होणार आहेत, असे ना. रवींद्र चव्हाण म्हणाले.

अमित शहांच्या सभेमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून केंद्रीय गृहमंत्री रत्नागिरी दौऱ्यावर प्रथमच येत असल्याने त्यांच्या जंगी स्वागताची तयारी करण्यात येत आहे. आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, किरण सामंत, लोकसभा सह प्रभारी तथा माजी आमदार बाळासाहेब माने, बाबा परुळेकर, डॉ हृषीकेश केळकर, अतुल काळसेकर, सुजाता साळवी, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, प्रमोद जठार, राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजश्री विश्वासराव, प्रमोद अंधटराव यांच्यासमवेत, सर्व विधान सभाप्रमुख सर्व पदाधिकारी या सभेच्या तयारीत सक्रीय आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular