आ. शेखर निकम यांची मध्यस्थी आणि जिल्हाधिकारी यांची रिक्षा संघटनेशी चर्चेनंतरे आ शेखर निकम यांच्यावर विश्वास व्यक्त करीत ‘जिल्हा रिक्षा संघटनेने मतदानावर टाकलेला बहिष्कार मागे घेतला असूनं जिल्ह्यातील लाखो रिक्षा चालक मालक आता आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बहिष्कार मागे घेतल्याची घोषणा संघटनेचे नेते दिलीप खेतले यांनी केली आहे. रिक्षा प्रवाशी वाहतूक परवाना आणि रिक्षा चालक मालक याच्या अनेक समस्या या संदर्भात अनेक वेळा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले होते.
मात्र प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने २६ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांना रिक्षा संघटनेने निवेदन देत लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार घातला होता जिल्ह्यात लाखो रिक्षा चालक मालक आसताना आणि त्यानी प्रसशासनाला निवेदन दिले असतानाही वेळीच दखल घेण्यात आली नव्हती. रिक्षा संघटनेच्या बहिष्कारानंतर आ शेखर निकम यांनी रिक्षा संघटनेचे नेते दिलीप खेतले, प्रताप भाटकर, संजय जोशी, विठ्ठल दाते, प्रशांत गोरीवले, संतोष सातोशे, पप्पी भाटकर, राजन घागं, अविनाश कदम आदींच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली.
यावेळी रिक्षा संघटनेच्या पदाधिकारी यांनी शासनाने निवेदन दिले असतानाही कोणतीही दखल घेतली नसल्याचे आ. शेखर निकम याना’ स्पष्ठ केले. आ. निकम यांनी या संदर्भात तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याजवळ चर्चा केली जिल्ह्यातील लाखो रिक्षा चालक मालक याच्या भावना जाणून घ्याव्यात असे सूचित केले. त्याच सोबत आ. निकम यांनी मी तुमच्या सोबत असल्याचे आश्वासन दिले.
आ. निकम आणि रिक्षा संघटना पंदाधिकारी चर्चा सुरू असतानाच जिल्हाधिकारी यांनी रिक्षा संघटना पदाधिकारी याना चर्चेला निमंत्रित करण्याचा दूरध्वनी आला. त्या नुसार तात्काळ रत्नागिरी येथे सकारात्मक चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात सन्म ानपूर्वक तोडगा काढण्याचे आश्वासन देताच निवडणुकीवरचा बहिष्कार मागे घेण्यात येत असल्याचे पदाधिकारी यांनी स्पष्ट केले. मात्र तोडगा न निघाल्यास विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला.
दरम्यान बहिष्कार मागे घेतल्यानंतर रिक्षा संघटनेच्या पदाधिकारी यांनी सावर्डे येथे आ. शेखर निकम याची भेट घेऊन जिल्हाधिकारी यांच्या सोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली. यावेळी आ. निकम यांनी मी तुमच्या सोबत आहे. तुमच्या समस्या मार्गी लावण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू असे सांगताच आमचा तुमच्यावर विश्वास आहे म्हणूनच आम्ही आमच्या समस्या तुमच्याकडे मांडल्या असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.