22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeSindhudurgसिंधुदुर्गात मतदान आटोपताच धुमशान ! लाथाबुक्क्यांनी व दांड्यांनी बेदम मारहाण !

सिंधुदुर्गात मतदान आटोपताच धुमशान ! लाथाबुक्क्यांनी व दांड्यांनी बेदम मारहाण !

श्री. बाळा राऊत यांना लाथा बुक्क्यांनी व दांड्यानी जबर मारहाण केली.

अखेर जी भीती वाटत होती ती काल काही प्रमाणात खरी ठरली. मतदान आटोपताच शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला युतीच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला त्यामुळे साऱ्या विभागात एकच खळबळ उडाली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी लोकसभा मतदार संघातील मतदान मंगळ दि. ७ मे रोजी सायं. ६ वा. आटोपल्यावर काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

२ गाड्यातून आले! – मतदान पूर्ण झाल्यावर ठाकरे शिवसेनेचे श्री. बाळा राऊत हे शेर्पे दुकान येथे बसले असता सायं. ६.२० चे सुमारास दोन गाड्या भरुन कार्यकर्ते आले व त्यांनी काही समजण्याच्या आत श्री. बाळा राऊत यांना लाथा बुक्क्यांनी व दांड्यानी जबर मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली असे जखमी श्री. बाळा राऊत यांनी सांगितले.

नेते मंडळी धावून आली – या घटनेचे वृत्त काही वेळातच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पसरले आणि मग ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संदेश पारकर, ज्येष्ठ नेते श्री. सतीश सावंत, श्री. अतुल रावराणे, युवा सेना जिल्हाप्रमुख श्री. सुशांत नाईक, शिवसेना नेते श्री. कन्हैया पारकर, कणकवली उप तालुका प्रमुख श्री. महेश कोळसुलकर आदी मंडळी तत्परतेने खारेपाटण येथे दाखल झाली.

अधिक उपचारांसाठी! – दरम्यान श्री. बाळा राऊत यांना खारेपाटण प्राथ. आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले होते. नेते मंडळींनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. यानंतर जखमी बाळा राऊत यांना पुढील उपचारांसाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे तातडीने सरकारी अॅम्ब्युलन्सने नेण्यात आले. राडा झाल्याचे वृत्त समजताच सर्वत्र खळबळ उडाली.

रितसर गुन्हा दाखल – रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवून घेण्याचे काम सुरु होते. याप्रकरणी भाजपचे श्री. बाळा जठार, श्री. दिलीप तळेकर व श्री. नाना शेट्ये यांचेवर इं.पी. कोड कलम ३२३, ३२४, १४४, १४९, १४३ आदी कलम ांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस स्थानकातून सांगण्यात आले. याबाबत तपास सुरु करण्यात आला आहे.

आंदोलनाचा इशारा – या हल्ल्याची तातडीने सखोल चौकशी व्हावी व हल्लेखोरांना जेरबंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संदेश पारकर व शिवसेना नेते श्री. सतीश सावंत यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular