27 C
Ratnagiri
Monday, May 20, 2024

चिपळूणला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी चिपळूण आणि...

कोकणातील तब्बल ६१३ गावे दरडीच्या सावटाखाली

कोकणातील शेकडो गावे आजही दरडींच्या सावटाखाली आहेत....

कोकणात वादळामुळे महावितरणला ५१ लाखांचा फटका

चिपळूण व गुहागर तालुक्यात झालेल्या वादळी वारा...
HomeRatnagiriगणपतीपुळेतील पर्यटकांत निवडणुकीमुळे घट

गणपतीपुळेतील पर्यटकांत निवडणुकीमुळे घट

गणपतीपुळेमध्ये दिवसभरात आठ ते दहा हजार लोकांनी श्रींचे दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे.

लोकसभा निवडणुकीतील तिसरा टप्प्यातील मतदानामुळे गणपतीपुळेमध्ये फिरायला येणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्या घटली आहे. उन्हाळी सुट्या सुरू झाल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गणपतीपुळेसह विविध ठिकाणी पर्यटकांची पावले वळतात. मात्र, आज रत्नागिरीतील मतदानाच्या दिवशी गणपतीपुळेमध्ये दिवसभरात आठ ते दहा हजार लोकांनी श्रींचे दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक मुंबई-पुण्यातील पर्यटकांचा राबता होता.

उन्हाचा कडाका आणि राज्यभर सुरू असलेला लोकसभा निवडणुकीचे वातावरण यामुळे कोकणातील पर्यटनस्थळांवरील पर्यटकांची गर्दी घटलेली आहे. दरवर्षी सर्वसाधारण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडतात. त्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीमधील तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (ता. ७) झाले. याच दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील जागांवर मतदान प्रक्रिया झाली. मात्र, मुंबईतील मतदान शेवटच्या टप्प्यात आहे. गणपतीपुळेमध्ये सर्वाधिक पर्यटक मुंबई-पुण्यासह बेळगाव, कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातून येतात. मतदानाच्या दिवशीही गणपतीपुळेमध्ये दिवसभरात श्रींचे दर्शन घेऊन येणाऱ्यांची संख्या दहा हजारावर पोचल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरवर्षी मे महिन्याच्या सुरवातीला हा आकडा पंधरा ते वीस हजाराच्या दरम्यान असतो. यंदा त्यात घट झाली आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे पर्यटकांची संख्याही कमी झाली आहे. बहुसंख्य पर्यटक थंड हवेच्या ठिकाणी फिरायला बाहेर पडत आहेत. रात्री प्रवास करून दिवसा विश्रांती घेण्यावर अनेकांचा भर आहे. समुद्रकिनारीही उन्हाचा कडाका असल्याने पर्यटकांचा राबता कमी आहे. तसेच निवडणुकीमुळे पश्चिम महाराष्ट्रातून येणारा वर्ग कमी आहे. निवडणूक असलेल्या जिल्ह्यातील लोकांनी फिरायला बाहेर पडणऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात किनारी भागात पर्यंटकांचा राबता वाढेल अशी आशा किनाऱ्यावरील पर्यटकांना वाटत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular