26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriरत्नागिरीजवळ अपघात रिक्षाचालकाचा मृत्यू

रत्नागिरीजवळ अपघात रिक्षाचालकाचा मृत्यू

करबुडेफाटा येथील उतारात त्याच्या रिक्षाचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला.

रिक्षाचे ब्रेक निकामी झाल्याने रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात रिक्षा चालक निलेश दत्ताराम रेवाळे (वय ३२, रा. रेवाळेवाडी, भोके) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास करबुडे फाटा येथील उतारावर झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निलेश बुधवारी रिक्षा घेऊन करबुडेफाटा ते वेतोशी रस्त्याने जात असताना करबुडेफाटा येथील उतारात त्याच्या रिक्षाचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. यामध्ये त्याच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली.

या बाबत माहिती मिळताच नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता पहाटे साडेतीनच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular