21.9 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriखेड तालुक्यात कोट्यवधींच्या सागाच्या लाकडांचा साठा?

खेड तालुक्यात कोट्यवधींच्या सागाच्या लाकडांचा साठा?

वनविभाग अनधिकृत व बेकायदेशीर लाकूड साठा करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.

खेड ठिकठिकाणी उघड्या जागेवर तसेच काही लाकूड गिरण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपये किमतीच्या सागांची लाकडे पाहायला मिळत असून ही. अधिकृत आहेत की अनधिकृत असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात वन विभागाकडे सागाने खचाखच जिकडेतिकडे भरलेल्या लाकडांची माहिती घेण्याबाबत तक्रार केली असता लाकडे मोजण्याचे काम सुरू असल्याने लाकडे मोजण्यासाठी पुढील काही दिवस आम्हाला वेळ नसल्याचे अजब उत्तर खेडच्या वन अधिकाऱ्यांनी दिले, या अजब उत्तरामुळे वनविभाग अनधिकृत व बेकायदेशीर लाकूड साठा करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यांमध्ये खाडीपट्टा, बांदर पट्टा, धामणंद पट्टा, दापोली म ार्गावर, मुंबई गोवा महामार्ग विभाग व अन्य ठिक ठिकाणी असणाऱ्या काही लाकूड गिरण्यांमध्ये तसेच उघड्यावर मोठ्या प्रमाणावर सागांच्या लाकडांचा साठा पाहायला मिळते. एखाद्या लाकूड गिरणीमध्ये एखाद्या प्रकारचं लाकूड किती प्रमाणात असावं यासाठी काही नियमावली आहे. महत्त्वाचं म्हणजे सागाच्या लाकडांना वन विभागाचे काही नियम देखिल आहेत. मात्र सद्यस्थिती पाहाता अनेक ठिकाणी सागांच्या लाकडांचे मोठं मोठे थर पाहायला मिळत आहेत, लाकूड गिरण्याच नाही तर अनेक ठिकाणी मोकळ्या खाजगी जागेमध्ये देखिल शेकडो सागाची लाकडे एकावर एक थर टाकून साठवलेली पाहायला मिळत आहे.

या संदर्भात काही नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना दिली. मात्र सध्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार माकड, वानर प्रगणना म्हणजेच त्यांची मोजणी करण्याचे काम सुरू असल्यामुळे लाकडांची मोजणी करायला व कारवाई करायला सध्या काही दिवस वेळ नसल्याचे अजब उत्तर देण्यात आले, हे सर्वेक्षण नक्की करावे, मात्र तक्रारींकडे देखील प्राधान्याने पाहाणे गरजेचे आहे, यासंदर्भात दापोली येथील विभागीय वनक्षेत्रपाल श्री पाटील यांच्याशी विचारणा केली असता आपण खेड तालुका व परिसरामध्ये काम असा असून लाकूड गिरण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ती करून ठेवलेल्या सागांच्या लाकडाची व खाजगी मोकळ्या जागेत भरमसाठ मोठ्या प्रमाणावर साठवलेल्या सागांच्या लाकडाची तपासणी करून कारवाईचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान माकडांचे कारण सांगून उपस्थित महत्त्वाच्या लाकडांच्या मुद्याला बगल देण्याचे येथील वन अधिकारी करत असून त्यांचा या अनधिकृत असलेल्या लाकूड साठ्याला व लाकूड साठा करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे तर कामा करत नाही ना प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात जिल्हा वनअधिकारी यांनी आपल्या भरारी पथकामार्फत खेड तालुक्यातील या परिस्थितीच सर्वे करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे त्या ठिकाणी असलेला सागांच्या लाकडाचा साठ अधिकृत आहे की, अनधिकृत याबाबत समय त्या ठिकाणी जाऊन पाहाणे करणे गरजेचे जर अनधिकृत असेल तर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular