22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeChiplunजगबुडी नदीपात्रातून दिवसाला २०० ब्रास गाळ उपसा…

जगबुडी नदीपात्रातून दिवसाला २०० ब्रास गाळ उपसा…

यांत्रिकी विभागामार्फत गाळ व बेटे काढण्याचे काम वेगाने सुरू आहे.

खेड शहरातील जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसण्यासह बेटे काढण्यासाठी आमदार योगेश कदम यांच्या पाठपुराव्याने २ कोटी ८४ लाख रूपयांचा निधी मंजूर होताच प्रत्यक्षात गाळ उपसण्याचे कामही हाती घेण्यात आले. अलोरे जलसंपदाच्या यांत्रिकी विभागामार्फत युद्धपातळीवर गाळ उपसण्याचे काम सुरू असून दिवसाला २०० ब्रास नदीपात्रातून गाळ उपसा केला जात आहे. यासाठी २ पोकलेनसह ६ डंपरे आदी यंत्रसाम ग्री तैनात करण्यात आली आहे, पाऊस पडेपर्यंत गाळ उपसण्यासह बेट काढण्याचे काम सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

बारमाही वाहणाऱ्या जगबुडी नदीपात्र गाळाने वेढले आहे. याचमुळे पावसाळ्यात अतिवृष्टीदरम्यान जगबुडी पुराचे पाणी बाजारपेठेत घुसून व्यापाऱ्यांसह नदीकाठच्या रहिवाशांची कोट्यवधी रूपयांची हानी होते. वर्षानुवर्षे हे चक्र कायम असल्याने व्यापाऱ्यांसह रहिवाशांवर पुराची टांगती तलवार कायम राहिली होती. या पार्श्वभूमीवर शहर व्यापारी संघटनेने आमदार योगेश कदम यांची भेट घेवून नदीपात्रातील गाळ उपसण्यासाठी साकडे घातले होते. शहर व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आग्रही मागणी आमदार योगेश कदम यांनी गांभिर्याने घेत शिवसेना नेते रामदास कदम यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसण्यासह बेट काढण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठीं आग्रह धरला होता.

सततच्या पाठपुराव्यानंतर २ कोटी ८४ लाख ९७२ रूपये खर्चाच्या अंदाजपत्रकासह प्रशासकीय मान्यता मिळाल्याने प्रत्यक्षात गाळ उपसण्याचे काम हाती घेण्यात आले. अलोरे जलसंपदा विभागाच्याखेड जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसण्यासाठी तैनात यंत्रसामुग्री यांत्रिकी विभागामार्फत २ पोकलेनच्या सहाय्याने गाळ उपसला जात आहे. यासाठी ६ डंपरही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दिवसाला २०० ब्रास गाळ उपसला जात आहे. नदीपात्रातून उपसण्यात आलेला गाळनगर परिषदेच्या राखीव भूखंडांमध्ये टार्कला जात आहे. नगर प्रशासनाकडे रितसर पत्रव्यवहार करून ४ ते ५ भूखंडांमध्ये उपसलेला गाळ टाकण्याची मुभा दिली आहे.

पावसाळा तोंडावर येवून ठेपल्याने यांत्रिकी विभागामार्फत गाळ व बेटे काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. यासाठी आवश्यक यंत्रसामुग्रीसह जलसंपदाच्या यांत्रिकी विभागाचे कर्मचारीही दिवसभर राबत आहेत. शहरातील मटण-मच्छी मार्केट येथील नदीपात्राबरोबरच भरणे येथील जगबुडी नदीपात्रापासून नारिंगी नदीपर्यंत व नारिंगी नदीपासून पुढे योगिताः दंत महाविद्यालयापर्यंतच्या ३ कि.मी. अंतरापर्यंतचाही गाळ उपसण्यात येणार आहे. पाऊस पडेपर्यंत गाळ उपसण्याचे काम सुरूच राहणार आहे. त्यामुळे किनाऱ्यालगतच्या लोकांना दिलासा मिळणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular