22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRajapurतुतारीसह अन्य एक्स्प्रेस सौंदळला थांबवा

तुतारीसह अन्य एक्स्प्रेस सौंदळला थांबवा

गाड्यांना अद्यापही थांबे मिळत नसल्याचा फटका तालुक्यातील प्रवाशांना बसत आहे.

कोकण रेल्वेच्या तालुक्यातील सोल्ये येथील राजापूर रोड आणि सौंदळ येथील थांब्यामुळे तालुकावासीयांनी देशातील विविध भागांमध्ये कोकण रेल्वेच्या माध्यमातून जा-ये करणे अधिक सुलभ झाले आहे. राजापूर रोड आणि सौंदळ येथील थांब्यांनाही प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून कोकण रेल्वेच्या उत्पन्नामध्ये भर पडत आहे; मात्र, या दोन्ही ठिकाणी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या आठ रेल्वेगाड्यांना थांबा मिळत आहे. त्याचा फटका तालुक्यातील प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे सोल्ये येथील राजापूर रोड आणि सौंदळ येथील थांब्यावर कोकण रेल्वेच्या तुतारी एक्स्प्रेसह अन्य एक्स्प्रेस गाड्यांनाही थांबा मिळावा, अशी मागणी तालुक्यातील गोठणे दोनिवडे हातणकरवाडी येथील माता पूर्वादेवी ग्रामविकास मंडळ मुंबईतर्फे कोकण रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

याबाबतचे लेखी निवेदन कोकण रेल्वे प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती गोठणे दोनिवडे हातणकरवाडी येथील माता पूर्वदिवी ग्रामविकास मंडळ मुंबईचे सेक्रेटरी यशवंत जड्यार यांनी दिली. निवेदन खासदार नारायण राणे, आमदार राजन साळवी यांनाही देण्यात आल्याचे जड्यार यांनी सांगितले. कोकण रेल्वेच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक गावे देशातील विविध भागांना जोडली गेली आहेत. त्याचवेळी येथील लोकांचा प्रवासही अधिक सुलभ झाला आहे. मात्र, या ठिकाणी अनेक गाड्यांना अद्यापही थांबे मिळत नसल्याचा फटका तालुक्यातील प्रवाशांना बसत आहे.

या मागण्यांसह सौंदळ येथील स्टेशनवर सुलभ शौचालय, सुसज्ज तिकीट खिडकी, प्लॅटफॉर्म आदी मुलभूत सुविधांची उभारणी करावी, अशी मागणी कोकण रेल्वे प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती जड्यार यांनी दिली. राजापूर रोड आणि सौंदळ येथे दिवा सावंतवाडी एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस या रेल्वेगाड्या थांबतात.

RELATED ARTICLES

Most Popular