25.4 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriजिओ, एअरटेल आणि व्हिआय महागले, ग्राहकांची पावलं बीएसएनएलकडे वळली

जिओ, एअरटेल आणि व्हिआय महागले, ग्राहकांची पावलं बीएसएनएलकडे वळली

दरवाढीचा फायदा बीएसएनएलला कंपनी मोठ्या प्रमाणात झाला आहे.

जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या खासगी कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लानच्या दरात मोठी वाढ केली. या. दरवाढीमुळे ग्राहकांना मोठा झटका बसला. मात्र, या दरवाढीचा फायदा सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या बीएसएनएलला मोठ्या प्रमाणात झाला आहे. कारण, जिओ, एअरटलेच्या दरवाढीनंतर ग्राहकांनी आपली पावलं बीएसएनएलकडे वळवल्याचं दिसून येत आहे. सर्वसामान्य नागरिकांनी आता बीएसएनएलला प्राधान्य देत सिम कार्ड खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या जून महिन्यापासून बीएसएनएलकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.

यासोबतच बीएसएनएलने जूनपासून ४जी बेस ट्रान्सीव्हर स्टेशन बसवण्याचा स्पीड सुद्धा वाढवला आहे. पूर्व उत्तरप्रदेशात आणखी ५५०० बीटीएस बसवले जात आहेत. बीएसएनएल ४ जी सेवेच्या अपेक्षा वाढल्याने ग्राहकांनी आता सरकारी टेलिकॉम कंपनीची सेवा घेण्यास सुरुवात केली आहे. २८ जून रोजी खासगी क्षेत्रातील जिओ, एअरटेल आणि या प्रमुख कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लानच्या दरात मोठी वाढ केली. त्यापाठोपाठ वोडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपनीने सुद्धा आपल्या रिचार्ज प्लानच्या किमतती वाढ केली. यामुळे ग्राहकांनी बीएसए- नएलला पसंती देण्यास सुरुवात केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular