27.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriसंगमेश्वरात एसटीतून चक्क छत्र्या उघडून करावा लागला प्रवास

संगमेश्वरात एसटीतून चक्क छत्र्या उघडून करावा लागला प्रवास

संगमेश्वर ते करजुवेसाठी सोडण्यात आलेल्या एसटीची दुर्दशा अशीच होती.

शनिवारी संगमेश्वर ते कोंडये सोडण्यात आलेल्या एस. टी. महामंडळाच्या बसच्या छतातुन जलधारा वाहु लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची धांदल उडाली. छतातून लागलेल्या जलधारा प्रवाशांच्या आसनावर पडत होत्या. तसेच तुटलेल्या खिडक्या आणि छतातून जलधारा प्रवाशांच्या अंगावर पडू लागल्याने प्रवाशांवर भिजत तसेच छत्र्या उघडून प्रवास करण्याची नामुष्की ओढवली. या जलधारा एकाच ठिकाणाहून नव्हे तर अनेक ठिकाणाहून लागल्या होत्या. एसटी बसमध्ये आसन असूनही ती पूर्णतः पाण्याने ओलीचिंब झाल्याने प्रवाशांना आणि विशेष करून शालेय विद्यार्थ्यांना कोंडये ते संगमेश्वर वीस ते पंचवीस किलो मिटर अंतर तेही डोंगर उताराच्या व खाच खलग्यांच्या रस्त्यावरून उभ्याने प्रवास करण्याची वेळ आली.

महिला व खासकरून वयोवृद्धावरही तशीच वेळ आली. दुपारी संगमेश्वर ते करजुवेसाठी सोडण्यात आलेल्या एसटीची दुर्दशा अशीच होती. या एसटी बस च्या छतातूनही पावसाच्या जलधारा व्हावत होत्या त्या जलधारा अंगावर झेळून प्रवाशांना प्रवास करावा लागला. एकाच दिवशी ह्या मार्गावर सोडण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या गाड्या ह्या गळक्या सोडण्यात आल्याने प्रवाशी जनतेतून देवरुख आगाराच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन वेगवेळ्या बसेस रस्त्यावर आणल्या गेल्या आहेत. त्यामध्ये हिरकणी, शिवशाही सारख्या अद्यावत तंत्रज्ञान असलेल्या बसचा समावेश आहे. तर प्रवाशांमध्ये जनजागृतीसाठी नवनवे उपक्रमही महामंडळकडून राबवले जात आहेत. महिलांना प्रवासामध्ये पन्नास टक्के सूट दिल्यामुळे महामंडळाच्या तिजोरीतही वाढ होत आहे. पण प्रवाशांच्या नशिबी अजूनही मोडक्या आणि गळक्या एस.टी बसेस रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशी वर्गातून नाराजीचे सूर उमटत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular