27.7 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriरत्नागिरीमध्ये मोबाईलला स्टेटस ठेवून वकिलाची आत्महत्या

रत्नागिरीमध्ये मोबाईलला स्टेटस ठेवून वकिलाची आत्महत्या

रात्रीची वेळ आणि मुसळधार पावसामुळे शोधकार्यात अडथळे येत होते.

माझ्या मृत्यूला फक्त मी जबाबदार आहे… माझी शेवटची इच्छा म्हणून, कृपया माझ्या मित्रांची, माझ्या नातेवाइकांची, माझ्या रूम मेटची, मी राहात असलेल्या मालकांची अथवा अन्य कोणाचीही कोणतीही चौकशी करू नका, असा स्टेटस ठेवत भाट्ये पुलावरून उडी मारून रत्नागिरीतील वकिलाने आत्महत्या केली. सौरभ श्रीकृष्ण सोहनी (वय ३२, रा. थिबापॅलेस, मूळ राजापूर) असे त्यांचे नाव आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहनी हे मूळचे राजापूर तालुक्यातील रहिवासी आहेत. ते रत्नागिरीत वकिली करीत होते. मित्रासोबत ते भाड्याने राहात होते.

मित्राची गाडी घेऊन जेवायला जातो, असे सांगून ते बाहेर पडले. त्यांनी थेट भाटये पूल गाठला. भाट्ये पुलावर आल्यानंतर आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका, अशा आशयाचे स्टेटस ठेवून त्यांनी समुद्रात उडी मारली. त्यांचे स्टेटस पाहून काही वकिलांनी पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर पोलिस त्यांच्या शोधात बाहेर पडले. रात्रीची वेळ आणि मुसळधार पावसामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. आज सकाळी अॅड. सोहनी यांचा मृतदेह खडपेवठार समुद्रकिनारी तरंगताना आढळून आला. याची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular