गणेशोत्सवासाठी कोकणात २०२ रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. म ात्र या रेल्वे गाड्यांचे आरक्षण अवघ्या ८ मिनिटात फुल झाल्याने कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीने थेट आक्षेप घेतला असून हा काळाबाजार असून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली आहे. आमच्या गणेशभक्त चाकरमान्याना जर तिकीट मिळत नसेल तर रेल्वेत घुसू असा इशारा देखील त्यांनी दिला. कोकणातील सर्वात मोठा उत्सव म्हणून गणेशोत्सव मानला जातो. त्यासाठी प्रशासनकडून देखील तयारी केली जाते.
गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी बसेस तसेच रेल्वे गाड्यांची अधिक व्यवस्था देखील प्रत्येकवर्षी केली जाते. त्याप्रम ाणे यावर्षी देखील रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर २०२ गणपती स्पेशल रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आरक्षण प्रक्रिया सोमवारी सुरू करण्यात आली. मात्र बुकिंग सुरू होताच. अवघ्या ८ मिनिटात सर्व २०२ रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल झाले. फक्त ८ मिनिटात आरक्षण फुल झाल्याने कोकण रेल्वे अन्यान निवारण ‘समितीने तीव्र आक्षेप घेतला आहे.
ही अनाकलनीय बाब असून या आरक्षण प्रक्रियेत मोठा काळाबाजार झाला आहे असा गंभीर आरोप समितीकडून करण्यात आला आहे. तिकिटांचा काळा बाजार करणारे एजंट आणि काही अधिकाऱ्यांची एक साखळी. यामध्ये कार्यरत असल्याची शंका असून या संपूर्ण प्रक्रियेची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली आहे. गेल्यावर्षी देखील असाच प्रकार समोर आला होता. त्याचवेळी जर कठोर भूमिका घेतली गेली असती तर यावर्षी हे घडले नसते. असेही मुकादम यांनी म्हटले
आहे. गणपती सणासाठी आमचा चाकरमानी वर्षभर पै-पै जमा करून कमी पैशात रेल्वे ने प्रवास करण्याची तयारी करत असतो. परंतु तिकीट बुकिंग. मध्ये होणाऱ्या आशा गोंधळामुळे त्याला शेवटी प्रवास करता येत नाही. आयत्यावेळी मग जास्त पैसे मोजून तिकीट घ्यावे लागते. जर आमच्या गणेशभक्त चाकरमान्यांनाच गणपती स्पेशल चा फायदा होत नसेल आणि एजंट लोकांची मजा होत असेल तर मात्र कोकण रेल्वे अन्यान निवारण समिती गप्प बसणार नाही. थेट रेल्वेत घुसून तिकीट तपासण्याचे काम करू असा इशारा देखील, मुकादम यांनी दिला आहे.