28.9 C
Ratnagiri
Tuesday, November 25, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriगर्भपात प्रकरणी जिल्ह्यात आणखी काही डॉक्टर रडारवर

गर्भपात प्रकरणी जिल्ह्यात आणखी काही डॉक्टर रडारवर

एका रुग्णालयावर कारवाई करीत गर्भपाताची औषधे जप्त केली होती.

गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात प्रकरणात आणखी काही जिल्ह्यातील डॉक्टर रडारवर आले आहेत. संबंधित यंत्रणा त्यांच्यावर नजर ठेवून आहे. मुलींची संख्या कमी होत असताना, रत्नागिरीसारख्या जिल्ह्यात अंशा गोष्टी घडणे हे चुकीचे असल्याचे मत आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय आणि पोलीस यंत्रणेनेने चार दिवसापूर्वी रत्नागिरी शहरालगतच्या एका रुग्णालयावर कारवाई करीत गर्भपाताची औषधे जप्त केली होती.

याबाबत कारवाई सुरु झाली असली तरी रत्नागिरीमध्ये आणखी चार ते पाच डॉक्टर असे प्रकार करीत असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना मिळाली आहे. त्यामुळे संबंधित डॉक्टरांकडेही आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे. अजुनही काहीजण रडारवर असून त्यांच्या हालचालींकडे पोलीस आणि आरोग्य या दोन्ही यंत्रणा नजर ठेवून आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular