26.6 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeRatnagiriमाचाळ पर्यटस्थळावरील हुल्लडबाजीला आळा - पोलिस आक्रमक

माचाळ पर्यटस्थळावरील हुल्लडबाजीला आळा – पोलिस आक्रमक

पोलिसांनी माचाळ येथे फलक लावून पर्यटकांना तंबी दिली आहे.

लांजा तालुक्यातील समुद्रसपाटीपासून ४ हजार फुटांवर असलेल्या माचाळ या पर्यटनस्थळाच्या ठिकाणी मद्यप्राशन आणि सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध लांजा पोलिसांनी कडक कारवाई करण्याचा फलक माचाळ येथे लावला आहे. माचाळ रस्ता हा खोल दरीचा आणि दाट धुक्याचा असल्याने सेल्फी काढण्यास मनाई करण्यात आली आहे. सेल्फीच्या नादात विविध ठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत. हे लक्षात घेऊन लांजा पोलिसांनी खबरदारी म्हणून लांजा पोलिसांनी माचाळ येथे फलक लावून पर्यटकांना तंबी दिली आहे.

हे पर्यटनस्थळ थंड हवेचे ठिकाण म्हणून घोषित केलेले आहे. तेथील रस्ता अरुंद आणि चढ-उताराचा असल्याने एका बाजूला दरी आहे. त्या रस्त्यावर दरडी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांनी आपली वाहने मर्यादित वेगाने चालवावीत. माचाळ मार्गावर खोल दरी असल्यामुळे सेल्फी काढू नये, सावधगिरी बाळगावी, अशा सूचना दिलेल्या आहेत. माचाळ मार्गावर वाहन चालवताना मद्यप्राशन केल्याचे आढळल्यास मोटारवाहन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल.

माचाळ पर्यटन ठिकाणी दारू पिऊन कोणी पर्यटकांनी शांतताभंग केल्यास कडक कारवाई करण्याच्या सूचना लांजा पोलिसांनी दिल्या आहेत. लांजा पोलिस ठाणे यांनी संकटकालीन संपर्क क्रमांक दिले आहेत. दरम्यान, गेल्या महिन्याभरात रत्नागिरी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील अनेक पर्यटक माचाळवर हजेरी लावत आहेत. शनिवार, रविवारी सुटीच्या दिवशी पर्यटकांचा राबता अधिक असतो. त्यामुळे प्रशासनाने सुरक्षितता बाळगली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular