25.8 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeKhedगुहागरात विना परवाना औषध विकणाऱ्यास अटक

गुहागरात विना परवाना औषध विकणाऱ्यास अटक

अनेकांनी हे औषध खरेदी करून स्वतःची फसवणूकही करून घेतली होती.

अर्धांगवायू आजारावर आयुर्वेदिक औषध असल्याचे सांगत ते विकण्यासाठी गुहागर तालुक्यात फिरणाऱ्या संशयिताला गुहागर पोलिसांनी अवघ्या २४ तासांतच अटक केली आहे. त्याची गाडीही जप्त करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे अनेकांची फसवणूक टळली आहे. गुहागर तालुक्यात अर्धांगवायू आजारावर असरदार असल्याचे सांगत औषध विकणारा एक जण गेले तीन दिवस गाडी घेऊन गाव- वाडीवार फिरत होता. काही गावांमध्ये त्याने या औषधावर बरेच पैसे घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अनेकांनी हे औषध खरेदी करून स्वतःची फसवणूकही करून घेतली होती.

या पार्श्वभूमीवर पोलिसांना याची माहिती मिळाली होती. संबंधित वाहन फिरताना दिसताच गुहागर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी केले होते. दरम्यान, पोलिस पाटील, जागरूक नागरिक यांना सूचना देण्यात आल्या होत्या. अखेर पोलिस सूत्राकडूनच माहिती मिळताच संशयित चंद्रकांत पांडुरंग वायकर (रा. माळशिरस, जि. सोलापूर) याला गुहागर येथे वाहनासह ताब्यात घेण्यात आले. या घटनेची फिर्याद संदीप शांताराम हळ्ये (रा. भाटलेवाडी, अडूर) याने पोलिसांना दिली.

संशयित वायकर हा आपल्या घरी येऊन त्याने पॅरालिसिसचे बरेच रुग्ण बरे केल्याचे सांगून माझ्या वडिलांचा पॅरालिसिसचा आजार पूर्णपणे तत्काळ बरे करतो, अशी बतावणी करून औषध विक्रीचा कोणताही परवाना नसताना त्याच्याकडील औषध हे अवास्तव किमतीत विकत घेण्यास फिर्यादीला भाग पाडले. त्याच्यासह एकूण ३ लोकांची १९ हजार ३०० रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. संशयितावर संशयिताला गाडीसह गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular