30.1 C
Ratnagiri
Wednesday, January 15, 2025

पदाला चिकटलेल्यांना बाजूला करा, चिपळुणात ठाकरे शिवसैनिकांची मागणी

रत्नागिरी जिल्ह्यात संघटना वाढवायची असेल, तर प्रथम...

रत्नागिरीत शिक्षकाचे वासनाकांड, नको नको ते थेर केले!

रत्नागिरीत भर मध्यवस्तीत असलेल्या गोदुताई जांभेकर विद्यालय...
HomeKhed२४२ गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण फुल्ल…

२४२ गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण फुल्ल…

दिवा चिपळूण मेमू स्पेशलच्या ३६ फेऱ्यांचाही समावेश आहे.

कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षण यापूर्वीच हाऊसफुल्ल झाले होते. यानंतर आता मध्य, कोकण व पश्चिम रेल्वेने तीन टप्प्यात जाहीर केलेल्या २४२ गणपती स्पेशलच्या फेऱ्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने चाकरमान्यांना गणेशोत्सवात गाव गाठण्याची चिंता सतावत आहे. यामुळे गणेशभक्तांच्या नजरा जादा गणपती स्पेशल गाड्यांकडे लागल्या आहेत. मध्य रेल्वेने पहिल्या टप्यात गणेशोत्सवासाठी तब्बल २०२ गणपती स्पेशलच्या फेऱ्या जाहीर करत चाकरमान्यांना सुखद धक्का दिला होता. यामध्ये दिवा चिपळूण मेमू स्पेशलच्या ३६ फेऱ्यांचाही समावेश आहे.

१६६ गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण खुले होताच अवघ्यां ८ मिनिटातच सर्वच फेऱ्या हाऊसफुल्ल होऊन चाकरमान्यांच्या हाती प्रतीक्षा यादीवरील तिकिटे पडली होती. आरक्षित तिकिटांवर दलालांनीच डल्ला मारल्याचा आरोपही करण्यात आला होता. मात्र रेल्वे प्रशासनाने ही बाब गंभीरपणे घेतल्याचे दिसत नाही. दुसऱ्या टप्यात पश्चिम रेल्वेने जाहीर केलेल्या सहाही गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण काही मिनिटातच फुल्ल झाल्याने चाकरम ान्यांचा पुन्हा हिरमोड झाला. यानंतर मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या २० फेऱ्यांचे आरक्षणही फुल्ल झाल्याने गणेशभक्तांच्या पदरी निराशाच पडली आहे.

तीनही टप्प्यात चाकरमान्यांच्या पदरात प्रतीक्षा यादीवरील तिकिटे पडल्याने गावी जाण्याच्या नियोजनावर पुरते पाणी फेरले आहे. त्यातच मध्यरेल्वेच्या नियमांचाही यंदाच्यागणेशोत्सवात चाकरमान्यांना मोठा फटका बसणार आहे. प्रतीक्षा यादीवरील तिकिटावरून प्रवास केल्यास दंडात्मक कारवाईसह कोणत्याही स्थानकात प्रवाशांना उतरवण्याची कारवाई केली जाणार आहे. यामुळे चाकरमान्यांची कोंडी झाली आहे. यामुळे वेटींगचे तिकिट काढूनही आरक्षण डब्यातून प्रवास करता येणार नसल्याने चाकरमान्यांना गाव गाठताना त्रास सहन करावा लागणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular