29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कन्या एक्स्प्रेसमध्ये तरुणीचा धिंगाणा, प्रवासी हैराण

कोकण रेल्वेमधील एसी डब्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या...

दुर्गम भागासाठी हवी स्वतंत्र संचमान्यता – मुख्याध्यापक संघाची मागणी

शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या संचमान्यता निर्णयामुळे...

वाढत्या समस्यांनी रत्नागिरीकर त्रस्त, शहराच्या दुरवस्थेबाबत भाजप आक्रमक

शहरातील खड्डेमय रस्ते, अनियमित पाणीपुरवठा, गटारांची खराब...
HomeRatnagiriऑनलाईन फसवणाऱ्या दोघांना बंगळूरमध्ये अटक

ऑनलाईन फसवणाऱ्या दोघांना बंगळूरमध्ये अटक

सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

रत्नागिरी सायबर पोलिसांनी बंगळूरमध्ये कारवाई करीत ऑनलाईन फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. हॉट बोट व इझी लोन या अॅपवरून घेतलेले कर्ज परत करा, अशी धमकी दिल्यावर फिर्यादीने कर्जाची परतफेड केली तरी अधिक रक्कम देण्यासाठी फिर्यादीचे वैयक्तिक फोटो अश्लील स्वरूपात एडिट करून तसेच काही फोटोंवर बदनामीकारक मजकूर लिहून त्यांचे पती तसेच नातेवाईकांना सोशल मीडियावर पाठवले. फिर्यादीचे मॉर्फ केलेले फोटो व बदनामीकारक संदेश इंटरनेटद्वारे फिर्यादी तसेच अन्य व्यक्तींना पाठवून बदनामी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणी डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरसह दोघांना अटक केली. नरसिम्हा नरसप्पा, (वय २४) व बुधीजागुल्ला राजशेखर (२०, दोघेही रा. बंगळूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. बुधीजागुल्ला राजशेखर याच्या तपासावरून नरसिम्हा नामक व्यक्तीने आजतागायत एकूण ६ बँक खाती वापरल्याचे निष्पन्न झाले. या खात्यांचा वापर नरसिम्हा लोकांना फसवून पैसे घेण्यासाठी करत होता. बुधीजागुल्ला त्याचा मावस भाऊ विजय याच्या नावे सीमकार्ड हे वापरत होता. त्यानंतर तपासामध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी नरसिम्हा हा सध्या राजराजेश्वरी नगर, बंगळूर येथे राहात असल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्यातील संशयित आरोपीने स्वतःचे तसेच इतरांचे आधारकार्ड व पॅनकार्डचा वापर करून सुमारे ३५ ते ४० व्यक्तींकडून त्यांनी बँक खात्याला लिंक असेलेला मोबाईल, बँक युजर आयडी व पासवर्ड घेऊन रिकव्हरी लोन अॅपकडून आलेली रक्कम ही त्या खात्यांमध्ये वळती करत होता.

तपासादरम्यान संशयित बंगळूर येथे असल्याची माहिती मिळाल्याने सायबर पोलिस ठाणे येथील हवालदार रामचंद्र वडार, संदीप नाईक, सौरभ कदम असे पथक ९ ऑगस्टला बंगळूर येथे गेले होते. तेथील पत्त्यावर चौकशी केली तेव्हा आरोपी त्याचे गावी दोड्डानकेरी, राज्य आंध्र प्रदेश येथे गेल्याचे समजले. अधिक तांत्रिक माहिती प्राप्त करून पथक बेंगलोर येथून तत्काळ तिकडे रवाना झाले. तेथील स्थानिक पोलिस व गोपनीय माहितीच्या आधारे तो राहत असलेल्या परिसरात लोकांची फसवणूक करत होता.

RELATED ARTICLES

Most Popular