22.7 C
Ratnagiri
Saturday, December 21, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeRatnagiriलाडक्या बहिणींना पैसे मिळू नये हीच विरोधकांची भावनाः आ. योगेश कदम

लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये हीच विरोधकांची भावनाः आ. योगेश कदम

आमदार योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे.

राज्यातील बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू नये म्हणून विरोधकांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे राज्यातील जनता काय समजायचं आहे ते समजली आहे, अशा शब्दात आमदार योगेश कदम हे विरोधकांनाही टोला लगावला आहे. शरद पवार यांचं म्हणणं होतं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हावेत मग आता महाविकास आघाडी करून मुख्यमंत्री पदासाठीचे नाव उद्धव ठाकरे यांच जाहीर का करण्यात आला नाही असाही सवाल करत आमदार योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही निरंतर सुरू राहील आता तुमच्या सगळ्यांचा भाऊच हक्काचा मुख्यमंत्री असल्याने तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. ही योजना मतदार संघातील प्रत्येक महिलेला कशी मिळेल याकडे आपण लक्ष दिले आहे, याबाबत कोणालाही समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत पोहोचवा पण या योजने पासून कोणतीही महिला वंचित राहणार नाही इतकच नाही तर जिल्ह्यात सर्वाधिक याच मतदारसंघात लाभार्थी वाहनांचे फॉर्म या योजनेअंतर्गत भरून घेण्यात आल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी यावेळी दिली.

यावेळी व्यासपीठावरती दापोलीचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार अर्चना बोंबे, निवासी तहसीलदार श्री. आडमुठे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील खरात तसेच या योजनेच्या अशासकीय सदस्य काजोल लोखंडे तसेच दापोली, खेड, मंडणगड मधीलमहिला अंगणवाडी सेविका, तलाठी, मंडल अधिकारी, महसूल कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular