23.2 C
Ratnagiri
Wednesday, January 15, 2025

पदाला चिकटलेल्यांना बाजूला करा, चिपळुणात ठाकरे शिवसैनिकांची मागणी

रत्नागिरी जिल्ह्यात संघटना वाढवायची असेल, तर प्रथम...

रत्नागिरीत शिक्षकाचे वासनाकांड, नको नको ते थेर केले!

रत्नागिरीत भर मध्यवस्तीत असलेल्या गोदुताई जांभेकर विद्यालय...
HomeRatnagiriयुवतीवरील अत्याचाराने रत्नागिरीकर एकवटले…

युवतीवरील अत्याचाराने रत्नागिरीकर एकवटले…

पिडीत तरूणीला न्याय  मिळावा यासाठी एकवटले असून संतापाची लाट उसळली आहे.

बदलापूरची घटना ताजी असतानाच रत्नागिरीत नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान रत्नागिरीक पिडीत तरूणीला न्याय  मिळावा यासाठी एकवटले असून संतापाची लाट उसळली आहे. याबाबत पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी नर्सिंगचे शिक्षण घेते. सोमवारी सकाळी ती ६ वा.च्या गाडीने रत्नागिरीत यायला निघाली. देवरुख – रत्नागिरी बसने ती प्रवास करीत होती. सकाळी सात ते सव्वा सातच्या सुमारास ती साळवी स्टॉप येथील बसथांब्यावर उतरली.

रिक्षेला हात केला – साळवी स्टॉप येथे उतरल्यानंतर त्या मुलीने नेहमीप्रमाणे रिक्षेला हात केला. एक रिक्षाचालक रेल्वे स्टेशनच्या दिशेने येऊन विरुध्द बाजूला उभा राहिला. ती तरुणी रस्ता क्रॉस करुन रिक्षेत बसायला गेली. ती रिक्षेत बसली आणि पुढे जे काही घडले ते तिला आठवत नाही असे पोलीसांनी सांगितले.

पाणी प्यायला दिले – त्या तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात असे सांगितले की मी रिक्षेत बसले. मला थोडे गरगरल्यासारखे झाले. त्यावेळी रिक्षा चालकाने मला पाणी प्यायला दिले. पाणी प्यायल्यानंतर माझी शुध्द हरपली. पुढे काय घडले, मी कुठे गेले हे काहीच आठवत नसल्याचे तिने सांगितले.

अडीच तासाने शुध्दीवर – पाणी प्यायला नंतर आपली शुध्द हरपली असे तिने नंतर पोलीसांना दिलेल्या जबाबात सांगितल्याची माहिती पोलीसांनी पत्रकारांना दिली. अडीच तासांनी म्हणजेच जवळजवळ सव्वा आठ ते साडेआठच्या सुमारास त्ती शुध्दीवर आली. कपड्यांची अवस्था पाहून ती घाबरली होती. आपण कुठे आहोत हे तिला काहीच कळत नव्हते असे तिने पोलिसांना सांगितले आहे.

बहिणीला कॉल केला – ही तरुणी शुध्दीवर आली त्यावेळी ती चंपक मैदानात होती. तिने लगेच आपल्याकडील मोबाईलवरुन आपल्या बहिणीला कॉल केला आणि सर्व हकीकत तिला सांगितली. आपण कुठे आहोत हे मला काहीच कळत नाहीये असे सांगून तिने आपल्या मोबाईलचे करंट लोकेशन आपल्या बहिणीला पाठवले.

दुचाकीस्वाराने चर्मालयात सोडले – शुध्दीवर आल्यानंतर तिने बहिणीला फोन केला व जिथे गर्दी असेल अशाठिकाणी चालत ये असे बहिणीने तिला सांगितले. ती चालत चालत रस्त्यावर आली. त्यावेळी एका दुचाकीस्वाराला तिने हात दाखवला. त्या दुचाकीस्वाराने तिला चर्मालयाच्या चौकात चार रस्ते जेथे एकत्र येतात तेथे सोडले. तत्पूर्वी तो दुचाकीस्वार तिच्या बहिणीशी फोनवर बोलला होता अशी देखील माहिती पुढे आली आहे.

नातेवाईक आले – चर्मालयात आल्यानंतर या दुचाकीस्वाराने तिच्या बहिणीला फोनवर सांगितले की तुमच्या बहिणीला चर्मालयात आणून सोडले आहे व तेथून दुचाकीस्वार निघून गेला. लगेचच त्या तरुणीच्या मोबाईलवर नातवाईकांचा कॉल आला, ‘तू जिथे आहेस तिथेच थांब आम्ही तुला न्यायला येतोय’ असे तिने पोलीसांना सांगितले आहे. काहीवेळात तिचे नातेवाईक चर्मालयाच्या चार रस्त्यात दाखल झाले.

रुमवर नेले – नातेवाईकांनी त्या तरुणीला सोबत घेतले व लगेचच आपल्या रत्नागिरी येथील फ्लॅटवर घेऊन गेले. सोमवारी सकाळी १० वा. च्या सुमारास त्या पीडित तरुणीचे आई वडील देखील रत्नागिरीत दाखल झाले. मुलीची विचारपूस केली व त्यानंतर सारा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांना कॉल केला – सकाळी १०.३० वा. सुमारास त्या मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या हेल्पलाईनवर कॉल केला. खबर मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मुलीला घेऊन पोलिस जिल्हा रुग्णालयात पोहोचले. याची माहिती शहर पोलिस, ग्रामीण पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आदींना मिळताच सर्व टीम घटनास्थळी दाखल झाल्या.

पोलिसांनी चौकशी केली – चंपक मैदानात बेशुध्दावस्थेत तरुणी सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. त्यामुळे स्वतः अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड या पीडितेची चौकशी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पोहोचल्या होत्या. त्यांनी पीडितेला विश्वासात घेतले आणि तिच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्या तरुणीने जी माहिती दिली त्या माहितीवरुन पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली.

मुलीच्या हातावर जखमा ? – पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार या पीडीत मुलीच्या हातावर खरचटल्यासारख्या जखमा असल्याची माहिती मिळाली आहे. ज्यावेळी शुध्दीवर आली तेव्हा आपल्या अंगावरील कपडे व्यवस्थित नव्हते अशी माहिती देखील त्या पीडितीने पोलिस जबाबात दिली आहे.

गुन्हा दाखल – त्या पीडित तरुणीने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी तात्काळ अज्ञाताविरोधात भारतीय न्याय संहिता कलम् ६४ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल होताच पोलिसांची विविध पथके तपासाच्या दिशेने कामाला लागली आहेत.

सीसीटीव्ही फूटेज मिळवले – ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी साळवी स्टॉपपासून चंपक मैदानापर्यंत जेवढे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्याचे फुटेज मिळविण्यासाठी विविध टीम पोलिसांनी पाठवल्या. काहीठिकाणी सीसीटीव्ही बंद होते तर काहीठिकाणी सीसीटीव्ही सुरु होते. या सीसीटीव्हीमध्ये नेमके काय पोलिसांच्या हाती सापडले याबाबत माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

पीडितेची मेडीकल चाचणी – ज्या पध्दतीने पीडित तरुणीने जबाब नोंदवला आहे. त्यानुसार पोलिसांनी ऑन कॅमेरा जबाब नोंदवून घेतला. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. दुसरा तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी पीडितेच्या रक्ताचे नमुने तसेच तिची वैद्यकीय तपासणी देखील केली आहे. रात्री उशिरापर्यंत वैद्यकीय तपासणीचा अहवाल पोलिसांना प्राप्त होणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular