23.9 C
Ratnagiri
Thursday, September 19, 2024

विराट कोहली एक हजारी क्लबमध्ये सामील होणार…

यजमान भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या...

या दिवशी थिएटरमध्ये फक्त 99 रुपयांमध्ये चित्रपट पहा…

चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 20...

चाकरमान्यांची कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्गावर गैरसोय

कोकणात सणाच्या निमित्ताने येणाऱ्या जाणाऱ्या चाकरमानी लोकांची...
HomeKhedप्रत्येक धनगरवाडयांवर रस्ते गेले पाहीजेत तरुणाला रोजगार हवाः रामदासभाई कदम

प्रत्येक धनगरवाडयांवर रस्ते गेले पाहीजेत तरुणाला रोजगार हवाः रामदासभाई कदम

प्रत्येक वाडीवर रस्ता व प्रत्येक वाडीवर नळ योजना राबवायची आहे

खेड, दापोली, मंडणगड विधान सभा क्षेत्रातील व कोकण कोकणातील प्रत्येक धनगरवाडयांवर रस्ते गेले पाहीजेत. प्रत्येक धनगरवाडीवर पिण्याच्या पाण्याची योजना झाली पाहिजे. प्रत्येक स्थानिक तरुणाला रोजगार मिळाला पाहीजे. गावातील बंद घरांची कुल्लूपे पुन्हा उघडली पाहिजेत, यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही कटीबद्ध आहोत, असे प्रतिपादन माजी मंत्री, शिवसेनानेते रामदासभाई कदम यांनी केले. सकल धनगर समाज महामेळावा मुंबईतील चाकरमानी व दापोली मंडणगड खेड येथील समाज बांधवांच्या उपस्थितीत घाटकोपर पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आ. योगेश कदम हेही उपस्थित होते.

आ. योगेश कदम यांनी आपल्या भाषणात समाज मेळाव्यात मार्गदर्शन केले.. प्रत्येक वाडीवर रस्ता व प्रत्येक वाडीवर नळ योजना राबवायची आहे, असे सांगितले. यावेळी दापोली विधान ‘सभा क्षेत्र नाना कदम, परशुराम साबळे (खेड तालुका प्रमुख मुंबई), पी. डी. गोरे-समाज नेते (महाराष्ट्र कोकण धनगर विकास मंडळ-संस्थापक अध्यक्ष गजानन खरात समाज नेते, गणपत गोरे, प्रशांत आखाडे, मंगेश गोरे, राहुल ढेबे, सुभाष गोरे, काशिनाथ गोरे, राकेश शिंदे, दिपक जानकर आदी समाज बांधव – भगिनी मोठ्या संख्येने उपास्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular