22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriगणेशोत्सवात सर्वांनी समन्वयाने काम करा - एम. देवेंदर सिंह

गणेशोत्सवात सर्वांनी समन्वयाने काम करा – एम. देवेंदर सिंह

जिल्ह्यात पोलिस, होमगार्ड, अधिकारी कर्मचारी बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

गणेशोत्सव शांततेत, सुरळीत आणि विनाअपघाती होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिल्या. गणेशोत्सव २०२४ पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली राजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात आज आढावा बैठक झाली. या बैठकीला पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. जास्मिन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ए. ए. देसाई, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता राजेंद्र कुलकर्णी आदींसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, ‘जिल्ह्यात गणेशोत्सवाची पूर्वतयारी जोरात सुरू आहे. प्रशासनही गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्था राखणे, गणेशभक्तांना योग्य ती सुविधा प्राप्त करून देणे, जिल्ह्यात खास गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रवास सुखकर होईल या दृष्टीने उपाययोजना करण्याच्यादृष्टीने सतर्क राहा. गणेशभक्तांच्या प्रवासात कोठेही अडचण न येता प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागाने सुविधा केंद्र उभारावीत. सुविधा केंद्रांवर पोलिस मदत केंद्र, आपत्कालीन पोलिस मदत टोईंग व्हॅन, क्रेन, वाहन दुरुस्ती कक्ष, आपत्कालीन वाहनदुरुस्ती आदी सुविधा असावी.

वैद्यकीय कक्ष, रुग्णवाहिका सेवा, मोफत आपत्कालीन वैद्यकीय उपचार सुविधा व मोफत चहा, बिस्किट, पाणी, ओआरएस आदी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याप्रसंगी पोलिस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, गणपती उत्सवावेळी जिल्ह्यात पोलिस, होमगार्ड, अधिकारी कर्मचारी बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागात विसर्जन घाटाकडे जाणारे रस्तेदेखील चांगले असणे गरजेचे आहेत. विसर्जन घाटावर लाईट व्यवस्था, बॅरिकेट्स आदींची व्यवस्था करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

RELATED ARTICLES

Most Popular