25.8 C
Ratnagiri
Monday, September 16, 2024
HomeRatnagiriजिल्हा परिषद, पालिका निवडणूक नव्या वर्षात

जिल्हा परिषद, पालिका निवडणूक नव्या वर्षात

राजकीय कार्यकर्त्यांमध्ये सध्या निरुत्साह पसरलेला आहे.

लोकसभेची निवडणूक झाली आणि खासदार दिल्लीला गेले. विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर होणार आणि आमदार मुंबईला जाणार; परंतु आपल्याच गावातल्या, जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका आणि नगरपंचायतींवर काम करण्याची इच्छा असणाऱ्या इच्छुकांना मात्र नेत्यांच्या फक्त पालख्या वाहण्याची वेळ आली आहे. सध्याची परिस्थिती पाहता नव्या वर्षातच या निवडणुकींचा धुरळा उडण्याची शक्यता आहे. राजकीय कार्यकर्त्यांमध्ये सध्या निरुत्साह पसरलेला आहे.

इंडिया आघाडीतील कार्यकर्ते लोकसभेमुळे जरा उत्साहात आहेत; परंतु महायुतीच्या कार्यकर्त्यांना पदेही नाहीत आणि अन्य लाभ निवडक लोकांनाच त्यामुळे त्यांच्यातही नाराजी आहे. या आधीच्या नियोजनानुसार २० सप्टेंबरपर्यंत विधानसभेची निवडणूक लागून नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल, असा अंदाज होता. महाराष्ट्रातील ही निवडणूक आता डिसेंबर २०२४ मध्ये होणार आहे. तसे स्पष्ट संकेत केंद्रीय निवडणूक आयोगानेही दिले आहेत. चिपळूण पालिकेचे इच्छुक नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे विविध पक्षांचे इच्छुक कार्यकर्ते, पदाधिकारी या निवडणुकांची वाट पाहून थकले.

चिपळूण पालिकेवर मागील तीन वर्षापासून तर पंचायत समितीवर अडीच वर्षांपासून प्रशासक राज आहे. चिपळूण शहरात तर फराळापासून किल्ल्यांच्या स्पर्धेपर्यंत, क्रिकेट स्पर्धेपर्यंत अनेकांनी गुंतवणूक केली. पालिका निवडणुका काही जाहीर होईनात. हीच परिस्थिती जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या इच्छुकांची झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular