23.7 C
Ratnagiri
Saturday, December 21, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeKhedखेडमध्ये पार्किंग व्यवस्थेअभावी वाहतूक कोंडी…

खेडमध्ये पार्किंग व्यवस्थेअभावी वाहतूक कोंडी…

अरूंद रस्ते, गटारे, पार्किंग सुविधा उपलब्ध नाही.

तालुक्यातील बसस्थानक, वाणीपेठ ते बाजारपेठ मुख्य रस्त्यावर वाहतूककोंडीमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे तसेच फेरीवाले, अनधिकृत माल विकणाऱ्यांमुळे रस्त्यांवरील वाहतूककोंडीत भर पडत आहे. शहरात आधीच वाहने उभी करण्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे वाहतूककोंडीने कहर केला आहे. या समस्येकडे खेड पोलिस प्रशासन आणि नगरपालिकेने दुर्लक्ष केलेले आहे. खेड शहराचा विस्तार होत असल्यामुळे त्याला आवश्यक पायाभूत पालिका प्रशासनाकडून उभारणीकडे लक्ष दिलेले नाही. अरूंद रस्ते, गटारे, पार्किंग सुविधा उपलब्ध नाही. गणेशोत्सवात चाकरमानी दाखल झाल्यामुळे खेड बाजारपेठेसह शहरातील वाहनांची संख्या वाढलेली आहे.

त्यामुळे वारंवार वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. अरूंद रस्त्यामुळे जेमतेम दोन वाहने पुढे नेणे शक्य होते. रस्त्यांवर फेरीवाल्यांची संख्या वाढल्यामुळे अनेकवेळा कोंडी होते. रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागतात. तिथे वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती असेल तर मात्र बराच काळ अडकून राहावे लागते तसेच रस्त्याच्या शेजारी वाहने उभी करून ठेवल्यामुळे वाहनकोंडीत भर पडते. पालिका प्रशासनाकडून रस्ते रुंदीकरण, फेरीवाले हटाव मोहीम आणि स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करणे आवश्यक आहे. वारंवार तक्रारी करूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. काही वाहनचालक वेगाने वाहने हाकत असल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. याचा सर्वाधिक फटका पादचाऱ्यांना बसतो आहे.

बसचालकांची कसरत – शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. पालिका प्रशासनाने केवळ मोजक्याच परिसरातील खड्डे बुजवून मार्ग सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. बसस्थानकाजवळील वळणामुळे बसचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यात खड्ड्यांची भर पडल्यामुळे मार्गही एका बाजूने खचत आहे. अपघाताचे धोके वाढले आहेत. रस्त्यावरून बस चालवणे चालकांच्या दृष्टीने अडचणीचे झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular