दीपावली सुट्टीच्या हंगामात कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने दिवाळी फेस्टिव्हल स्पेशल जाहीर केल्या आहेत. त्यात एलटीटी- सावंतवाडी, सावंतवाडी- पनवेल, एलटीटी-कोचुवेल्ली या फेस्टिव्हल स्पेशलचा समावेश आहे. कोकण रेल्वेमार्गावर सोडण्यात येणाऱ्या एलटीटी-कोचुवेल्ली फेस्टिव्हल वगळता अन्य ३ फेस्टिव्हल स्पेशल गाड्यांचे आरक्षण ११ सप्टेंबरपासून खुले होणार असल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. एलटीटी-सावंतवाडी फेस्टिव्हल स्पेशलच्या ८ फेऱ्या धावणार आहेत.
१८, २५ ऑक्टोबर, १ व ८ नोव्हेंबरला शुक्रवारी धावणारी स्पेशल एलटीटीहून सकाळी ८.२० वा. सुटून त्याच दिवशी रात्री ९ वा. सावंतवाडी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात सावंतवाडी येथून रात्री १०.२० वा. सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४० वा. एलटीटीला पोहचेल. २० एलएचबी डब्यांची स्पेशल ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ स्थानकात थांबेल. पुणे-सावंतवाडी फेस्टिव्हल स्पेशलच्या ८ फेऱ्या धावणार आहेत. २२, २९ ऑक्टोबर आणि ५, १२ नोव्हेंबरदरम्यान दर मंगळवारी धावणारी स्पेशल पुणे येथून सकाळी ९.३५ वा. सुटून त्याच दिवशी रात्री १०.३० वा. सावंतवाडी येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासात २३, ३० ऑक्टोबर व ६, १३ नोव्हेंबरदरम्यान बुधवारी धावणारी स्पेशल सावंतवाडी येथून रात्री ११.२५ वा. सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१५ वा. पुणे येथे पोहचेल. २० एलएचबी डब्यांची स्पेशल लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, सिंधुदुर्ग, कुडाळ स्थानकात थांबेल. सावंतवाडी-पनवेल साप्ताहिक स्पेशल २२, २९ ऑक्टोबर व५, १२ नोव्हेंबरदरम्यान दर मंगळवारी धावेल. सावंतवाडी येथून रात्री ११.२५ वा. सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४० वा. पनवेल येथे पोहोचेल.