26 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeChiplunकोकणात दिवाळीला चार 'फेस्टिव्हल रेल्वे', ३२ फेऱ्यांचा समावेश

कोकणात दिवाळीला चार ‘फेस्टिव्हल रेल्वे’, ३२ फेऱ्यांचा समावेश

गाड्यांचे आरक्षण ११ सप्टेंबरपासून खुले होणार आहे.

दीपावली सुट्टीच्या हंगामात कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने दिवाळी फेस्टिव्हल स्पेशल जाहीर केल्या आहेत. त्यात एलटीटी- सावंतवाडी, सावंतवाडी- पनवेल, एलटीटी-कोचुवेल्ली या फेस्टिव्हल स्पेशलचा समावेश आहे. कोकण रेल्वेमार्गावर सोडण्यात येणाऱ्या एलटीटी-कोचुवेल्ली फेस्टिव्हल वगळता अन्य ३ फेस्टिव्हल स्पेशल गाड्यांचे आरक्षण ११ सप्टेंबरपासून खुले होणार असल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. एलटीटी-सावंतवाडी फेस्टिव्हल स्पेशलच्या ८ फेऱ्या धावणार आहेत.

१८, २५ ऑक्टोबर, १ व ८ नोव्हेंबरला शुक्रवारी धावणारी स्पेशल एलटीटीहून सकाळी ८.२० वा. सुटून त्याच दिवशी रात्री ९ वा. सावंतवाडी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात सावंतवाडी येथून रात्री १०.२० वा. सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४० वा. एलटीटीला पोहचेल. २० एलएचबी डब्यांची स्पेशल ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ स्थानकात थांबेल. पुणे-सावंतवाडी फेस्टिव्हल स्पेशलच्या ८ फेऱ्या धावणार आहेत. २२, २९ ऑक्टोबर आणि ५, १२ नोव्हेंबरदरम्यान दर मंगळवारी धावणारी स्पेशल पुणे येथून सकाळी ९.३५ वा. सुटून त्याच दिवशी रात्री १०.३० वा. सावंतवाडी येथे पोहोचेल.

परतीच्या प्रवासात २३, ३० ऑक्टोबर व ६, १३ नोव्हेंबरदरम्यान बुधवारी धावणारी स्पेशल सावंतवाडी येथून रात्री ११.२५ वा. सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१५ वा. पुणे येथे पोहचेल. २० एलएचबी डब्यांची स्पेशल लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, सिंधुदुर्ग, कुडाळ स्थानकात थांबेल. सावंतवाडी-पनवेल साप्ताहिक स्पेशल २२, २९ ऑक्टोबर व५, १२ नोव्हेंबरदरम्यान दर मंगळवारी धावेल. सावंतवाडी येथून रात्री ११.२५ वा. सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४० वा. पनवेल येथे पोहोचेल.

RELATED ARTICLES

Most Popular