24.8 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeRatnagiriअल्पवयीन मुलीचे अपहरण; लोकेशनवरून लावला ट्रेस

अल्पवयीन मुलीचे अपहरण; लोकेशनवरून लावला ट्रेस

अल्पवयीन मुलगी ही रत्नागिरी येथे असल्याची माहीती प्राप्त झाली.

अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा कुडाळ पोलिसांकडून तात्काळ शोधघेत रत्नागिरी येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली. कुडाळ पोलीस ठाणे हद्दीत एक अल्पवयीन मुलगी दिनांक ३ सप्टेबर रोजी कुडाळ बाजारात जाऊन येते असे सांगून निघून गेली ती परत आली नाही. त्याबाबत अल्पवयीन मुलीच्या पालकांनी तिचा शोध घेतला, परंतु ती मिळून आलेली नसल्याने व सदरची मुलगी तिचे मित्रासोबत गेली असावी असा संशय व्यक्त केला. त्याबाबत मुलीचे पालकांनी आज दिनांक ९ रोजी कुडाळ पोलीस ठाणे येथे माहिती दिली.

अपहरण झालेली मुलगी ही अल्पवयीन असल्याने सदर घटनेचे गांभीर्य ओळखून कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी तात्काळ दखल घेवुन अपहरण झालेल्या मुलीबाबत संशयीत आरोपीताबाबत गोपनीयरित्या व तांत्रीक विश्लेषणाधारे माहीती काढली. त्यानंतर आरोपी व अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी ही रत्नागिरी येथे असल्याची माहीती प्राप्त झाली. त्यानंतर कुडाळ पोलीसांनी रत्नागिरी पोलीसांना याबाबत माहीती देवुन आरोपीच्या ठावठिकाण्याबाबत माहीती दिली. त्यावरुन सदर आरोपीस अपहरण केलेल्या मुलीसह ताब्यात घेवुन सदर गुन्हा हा तात्काळ उघडकीस आणलेला आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग श्री सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. कृषिकेश रावले, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. विनोद कांबळे श्री. राजेंद्र मगदुम, पोलीस निरीक्षक कुडाळ पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि गणेश कहऱ्हाडकर, पोलीस अंमलदार कृष्णा केसरकर, संजय कदम, प्रितम कदम, रुपेश सारंग तसेच रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार राहूल जाधव, अमोल भोसले, रत्नागिरी दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार महेश गुरव व आशिष शेलार यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular