25.4 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriसंगमेश्वरात वारंवार वीज पुरवठा खंडित - ग्रामस्थांमध्ये संताप

संगमेश्वरात वारंवार वीज पुरवठा खंडित – ग्रामस्थांमध्ये संताप

महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांकडून बेजबाबदार उत्तरे दिल्याने ग्राहक संतप्त झाले.

संगमेश्वर तालुक्यातील कडवई, तुरळ, धामणी, कसबा या गावात गणेशोत्सव सुरू असताना वीज पुरवठा सातत्याने दीर्घकाळ खंडित झाल्याने संतप्त झालेल्या ग्राहकांनी तुरळ आणि संगमेश्वर येथील कार्यालयावर सायंकाळी आणि मध्यरात्री दोन वाजता धडक दिली. महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांकडून बेजबाबदार उत्तरे दिल्याने ग्राहक संतप्त झाले. या घटनेनंतर पोलिस महावितरण कार्यालयात पोहचले आणि त्यांनी हस्तक्षेप करत वातावरण शांत केले. तालुक्यातील तुरळ महावितरण कार्यालयांतर्गत येणाऱ्या कडवई गावात अनेक ठिकाणी दोन दिवसांपूर्वी गणेशोत्सवात वीज पुरवठा खंडित झाला. ग्राहकांनी काही काळ वीज पुरवठा सुरळीत होण्याची वाट पाहिली.

काही तास उलटून गेल्यानंतर ग्राहकांचा संयम सुटू लागला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी तुरळ शाखा अभियंता बडगुजर यांना वारंवार फोन केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. अखेरीस जितेंद्र चव्हाण सहकाऱ्यांसह तुरळ महावितरण कार्यालयात धडकले. कनिष्ठ अभियंता बडगुजर यांचे वर्तन बेजबाबदारपणाचे असल्याचे पाहून जितेंद्र चव्हाण यांचा पारा चढला. कनिष्ठ अभियंता बडगुजर यांचा महावितरणने दिलेला भ्रमणध्वनी बंद का असा सवाल जितेंद्र चव्हाण यांनी उपस्थित करताच त्यांनी अत्यंत बेजबाबदार उत्तरे दिली. आपल्याकडे महावितरणचे ओळखपत्र का नाही असा सवाल चव्हाण यांनी विचारताच आम्ही काय २४ तास ओळखपत्रच घालून फिरायचे का, असा उलट सवाल बडगुजर यांनी चव्हाण यांना विचारला.

कसबा परिसरातही गणेशोत्सवात वीज पुरवठा खंडित झाला आणि तो वेळेत सुरळीत केला गेला नाही. कसबा येथील ग्राहक कनिष्ठ अभियंत्यांना फोन करत होता, मात्र त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. त्यामुळे या परिसरातील ग्राहकांचा संताप अनावर झाला. ग्राहक मध्यरात्री दोन वाजता महावितरणच्या संगमेश्वर कार्यालयावर धडकले. येथे गेल्यानंतर ग्राहकांना बेजबाबदार उत्तरे ऐकायला मिळाली. कसबा महावितरणचे शाखा अभियंता रजेवर असल्याचे आणि त्यांचा कार्यभार अन्य अभियंत्याकडे सोपवल्याचे संबंधितांना माहितीच नव्हते. याचा अर्थ कसबा येथील शाखा अभियंता विनापरवानगी रजेवर गेले असा होत असल्याने अधीक्षक अभियंत्यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी कसबा येथील ग्राहक धनंजय पाथरे यांनी केली.

RELATED ARTICLES

Most Popular